सोहम चिखले याची विज्ञान प्रदर्शनात जिल्हास्तरासाठी निवड

242

निर्वी, ता.शिरूर (प्रतिनिधी, शकील मणियार) : तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२२/२०२३ विद्या विकास मंदिर माध्यम व उच्च माध्यम विद्यालय निमगाव म्हाळुंगी या शाळेतील विद्यार्थी सोहम दादाभाऊ चिखले इयत्ता ८वी  या विद्यार्थ्याने ‘पलोटिंग हाऊस’ हा उपक्रम करून या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता. एक नाविन्यपूर्ण उपक्रम करून त्याने तिसरा क्रमांक पटकावला असून, त्याची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे. त्यासाठी त्याला मार्गदर्शक शाळेचे मुख्याध्यापक संजिव मांढरे सर, पर्यवेक्षक कुलट सर, मार्गदर्शिका वर्ग शिक्षिका फुलवरे मॅडम तसेच चव्हाण मॅडम, शेलार सर, सर्व शिक्षक वृंद कर्मचारी वर्ग यांचे मोठे योगदान मिळाले. सिटी बोरा कॉलेजचे प्राचार्य व ज्येष्ठ शास्त्रज्ञ के सी मोहिते सर, बी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य बाहेती सर, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर ,गट विकास अधिकारी अजित देशमुख, छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र थिटे, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके सर, मुख्याध्यापक संघाचे सचिव कदम सर, प्राचार्य अशोक सरोदे सर, मुख्याध्यापक गोरडे सर उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष काकासाहेब पलांडे तसेच सर्व संचालक मंडळ सर्व आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पालक, ग्रामस्थ यांनी सोहम याचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *