” युवती वक्ता महाराष्ट्राचा ” महाराष्ट्रातील युवती व महिलांचा उत्कृष्ट प्रतिसाद

419
पातूर,अकोला (-प्रतिनिधी,श्रीधर लाड) : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील मातृतीर्थ एका संस्थेच्या माध्यमातून “युवती वक्ता महाराष्ट्राचा” ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. राजमाता जिजाऊ राष्ट्र प्रेरणास्थान या विषयावर महाराष्ट्रातील युवती व महिलांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. संपूर्ण राज्यातून ११६ स्पर्धकांनी भाग घेतला होता. यामध्ये महाराष्ट्र राज्यातून द्वितीय क्रमांक अकोला जिल्ह्यातील पातूर येथील शरयू राजू उगले हिने मिळविला त्याबद्दल पातुर तालुक्यामध्ये तिचे कौतुक होत आहे.  शरयू अल्पभूधारक शेतकरी तसेच पातूर नगर परिषद सदस्य राजू लक्ष्मणराव उगले यांची मुलगी असून, कुठल्याही प्रकारची अनुकूल परिस्थिती नसताना जिद्द, चिकाटी आणि प्रयत्न यातून शरयू ने यश मिळवले आहे. सदर पातूर तालुक्यातील युवती करिता ती प्रेरणादायी ठरत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *