दोंडाईचात संत सेना महाराज ६५० वी पुण्यतिथी साजरी

311

दोंडाईचा,धुळे (-प्रतिनिधी,समाधान ठाकरे) : श.प्र. येथे संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी सेना महाराज यांची ६५० वी पुण्यतिथी पंचवटी मंदिरात प्रतिमा पूजनाने संपन्न झाले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जाहीररित्या कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा खंडीत न होऊ देता, पालखी मिरवणूक व इतर सर्व सामाजिक कार्यक्रमांना फाटा देऊन दोंडाईचा शहर नाभिक हितवर्धक संस्थेचे अध्यक्ष  देवीदास छगन चित्ते व दुकानदार संघाचे अध्यक्ष  किरण संतोष सुर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रम संपन्न झाला. शहरात रविवारी जनतेचा कर्फ्यू  पाळला जास असल्याने बाकीच्या समाज बाधंवानी घरीच परिवारा सोबत संत सेना महाराजाचे प्रतिमा पुजन करुन साजरी करून परीवारा सोबत फोटो काढून समाजाच्या व्हाट्सअप ग्रुपवर स्टेट्स,  फेसबुक टाकून अनोख्या पध्दतीने पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी जायन्टस् मिडटाउन गृप दोंडाईचा यांच्यावतीने कोरोना लाॅकडाऊन काळात समाजाला मदत व धीर देणाऱ्या नाभिक बांधवांना कोरोना सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी जायन्टस् मिडटाउनचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र चित्ते, मा. फेडरेशन प्रेसिडेंट चंद्रकांत जाधव, आरोग्य सभापती जितेंद्र गिरासे, अध्यक्ष प्रशांत चितोडकर उपस्थित होते. यावेळी जिल्हा दुकानदार संघाचे अध्यक्ष रवींद्र सैंदाणे,  तालुका अध्यक्ष रवींद्र चित्ते, शहर अध्यक्ष देविदास चित्ते, दुकानदार संघाचे अध्यक्ष किरण सुर्यवंशी, जेष्ठ सल्लागार भावराव सैंदाणे, छोटू महाले, अनिल ईशी, सुनील सैंदाणे, दिलीप सैंदाणे, महेंद्र चित्ते, रमेश मोरे, विलास शिरसाठ  राकेश चित्ते, राजेश मिस्तरी, योगेश मिस्तरी, भरत सैंदाणे उपस्थित होते. पुण्यतिथी कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र मोरे, गुलाब पवार, पंकज सैंदाणे, जगदीश ईशी, अजय ईशी भुषण अहिरे, रमेश चित्ते, विशाल महाले यांनी परीश्रम घेतले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *