श्रावणातील चौथ्या सोमवारी महादेवाचे पवित्र शिवलिंग विविध फुलांनी सजविले

396
घोडेगाव,ता.आंबेगाव (-प्रतिनिधी,सीताराम काळे) : हिंदू धर्मात श्रावण महिना पवित्र मानला जात असल्याने दरवर्षी श्री क्षेत्र भीमाशंकरला लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने मंदिर बंद ठेवल्याने संपुर्ण श्रावण महिना भक्तांविना ओस पडले आहे. श्रावण महिन्याचा शेवटच्या सोमवारी मोजक्या सेवा गुरव पुजारी व नाथपंती महाराज यांच्या उपस्थितीत पूजाविधी पार पडला.
बारा ज्यातिर्लींगांपैकी सहावे व पुणे जिल्हयातील एकमेव श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर आहे. श्रावणातील शेवटच्या सोमवारी पहाटेच्या सुमारास पूजाविधी पार पडल्यानंतर महादेवाचे पवित्र शिवलींग विविध रंगांच्या फुलांनी सजविण्यात आले होते. श्रावण महिन्यामध्ये चंद्रकांत कौदरे, दत्तात्रय कौदरे, गोरक्षनाथ कौदरे आदि सेवा गुरव पुजारी हे महादेवाची पुजा, आरती करत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे येथील स्थानिक आदिवासी बांधवांचा हार, बेल, फुल, प्लॅस्टिक घोंगटे विक्रि आदिंचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे नागरिकांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. या पवित्र शिवलींगाचे व पर्यटनांसाठी भक्तांनी, पर्यटकांनी येऊ नये यासाठी डिंभे, पालखेवाडी व श्री क्षेत्र भीमाशंकर येथे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार, पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव हे विशेष खबरदारी घेत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *