कोरोनाचा रुग्ण आढळल्याने मुरबाड शहरात चोख पोलीस बंदोबस्त 

422
मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) –  दुर्गम भाग असलेल्या मुरबाड सारख्या शहरातच कोरोनाचा रुग्ण सापडल्या ने मुरबाड शहर तीन दिवस पूर्ण बंद करण्यात आले असून अत्यावश्यक सेवे पैकी हॉस्पिटल व मेडिकल स्टोअर फक्त उघडे ठेवण्यात आले आहे. मात्र या काळात चोख पोलीस बंद ठेवण्यात आला आहे.  मुरबाड हा राष्ट्रीय महामार्ग 61 मुळे प्रवासाचा केंद्र बिंदू असल्याने या महामार्गावर अनेक अत्यावश्यक सेवा करणारी वाहने  तपासावी लागत आहेत. राष्ट्रीय महामार्ग 61 मुळे मुरबाड मार्गे अहमदनगर, पुणे,नाशिक,यासह सिरोंचा,गडचिरोली,नागपूर इत्यादी अनेक ठिकाणी जाण्यासाठी पर्याय असल्याने मोठया प्रमाणात गावाकडे या काळात जाणारी वाहने आढळतात.  मात्र चोख बंदोबस्त असल्याने हा मार्ग पूर्ण  बंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. शहर तीन दिवस पूर्ण बंद असल्याने पोलीस गावागावात ही गस्त घालताना दिसत आहेत. तर मुरबाड व परिसरातील अनेक नागरिक हे परगावी रहात असल्याने अश्या  गावाकडे येणाऱ्या नागरिकांनवर ही लक्ष ठेऊन आहेत  मात्र मुरबाड मध्ये कोरोना चा रुग्ण आढळल्याने नागरिकांना पोलिसांनी व मुरबाड नगरपंचायतने केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला आहे. शहरात परदेशातून आलेल्या व्यक्ती वर आरोग्य विभाग व पोलीस यंत्रणा लक्ष ठेऊन असून तीन दिवसाच्या या लॉकडाऊन ला नागरिक चांगला प्रतिसाद देत असल्याने पोलसानी राष्ट्रीय महामार्ग 61 वर लक्ष केंद्रित केले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *