संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने २५० गरीब कुटुंबाना धान्य,किराणा साहित्य वाटप

948
        दोंडाईचा,धुळे : (प्रतिनिधी,समाधान ठाकरे) –  संत निरंकारी चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोंडाईचा शहरातील २५० गरीब कुटुंबाना धान्य,किराणा साहित्य वाटप करण्यात आले.
         देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकवीस दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या शहरातील मजुरी करून हातावरचे पोट असणाऱ्या अनेक परिवारांवर  उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.  ही गंभीर परिस्थिती पाहून येथील संत निरंकारी चारीटेबल ट्रस्टच्या वतीने सद्गुरु माता सुदिक्षा संविदर हरदेवजी महाराज यांच्या आदेशानुसार व तसेच धुळे विभागाचे प्रमुख हिरालालजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण धुळे झोन ३६ – बी अंतर्गत प्रत्येक शाखेत आपल्या परीवार मधील ज्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे अशा परीवाला ट्रस्टच्या वतीने शिधा रेशन आणि किराणा वाटप माजी मंत्री तथा विद्यमान आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले.
        यावेळी दोंडाईचा शाखेचे मुखी प.आ. निर्मला बहनजी, सेवादल इन्चार्ज आ. संजय वाघ, बांधकाम सभापती निखिल जाधव, नगरसेवक संजय मराठे, भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण महाजन, भरतरी ठाकूर, संजय तावडे,  सभापती नरेंद्र कोळी, योगेश ठाकूर, आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी  २५० गोरगरिब कुटुंबाला अन्नधान्य, शिधा राशन व किराणा वाटप  वाटप करण्यात आला यात गहू, चहा पावडर, मिरची पावडर,तांदूळ, साखर बिस्कीट, इत्यादी वस्तू समावेश होता.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *