अबब ! ८ फुटी धामण सर्प – सर्पमित्र उस्मान मदारींनी शिताफीने पकडला 

607

कवठे येमाई ता.शिरूर : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – कोरोनाच्या पार्श्वभिमीवर सगळीकडे कडक बंद असताना कवठे येमाई गावठाणात राहणारे दुडे गुरुजी यांना भर दुपारी १२ च्या दरम्यान त्यांच्या घरा मागील मोकळ्या जागेत २ भलेमोठे सर्प एकमेकांशी खेळताना निदर्शनास आले.त्यांनी तातडीने सर्पमित्र उस्मान मदारी यांना फोन करून पाचाराण केले. मदारी यांनी अगदी लीलया या २ धामण जातीच्या सर्पांना पकडले.पण हे सर्प खूपच मोठे असल्याने त्यातील एक मादी धामण सर्प त्यांच्या हातातून सटकून पळून गेला तर नर धामण सर्पाला त्यांनी घट्ट पकडून पिशवीत जेरबंद केले.

ऐन दुपारी तेही गावठाणात हे मोठे सर्प दिसल्याने परिसरातील नागरिक चांगलेच घाबरले. तर उस्मान मदारी यांनी आता उन्हाळा चालू झाला असून अनेक छोटे-मोठे सर्प गारव्याला बाहेर पडतात.नागरिकांनी  विशेषकरून रात्रीच्या वेळी सापांपासून सरंक्षण व्हावे म्हणून दक्षता घ्यावी. सर्वच सर्प विषारी नसतात. साप निघाल्यानंतर त्यांना मारू नका. तातडीने नजीकच्या सर्पमित्रास कळवा. सर्पमित्र सापांना पकडून दूर जंगलात निसर्गाच्या सानिध्यात सोडण्याचे काम करीत असतात. सर्पमित्र उस्मान मदारी यांनी या मोठ्या सापास शिताफीने पकडल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *