दोंडाईचा शहरात नाभिक समाजातील गोरगरीब ६० कुटुंबाना किराणा साहित्य घरपोच देऊन मदतीचा हात – नाभिक नोकरदार वर्गाचा उपक्रम 

374
         दोंडाईचा,धुळे : (प्रतिनिधी,समाधान ठाकरे) – देशातील कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेत सरकारने देशात २१ दिवस लॉकडाऊन ठेवण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वत्रच कडक बंद असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अनेक छोटे,छोटे व्यवसाय ज्यांचे कुटुंबच हातावरचे आहे अशा अनेक कुटुंबांना बंद मुळे कामेच नसल्याने उपासमारीची वेळ येऊ लागली आहे. दोंडाईचा शहरात अनेक नाभिक कुटुंबे आपला पारंपारिक व्यवसाय करून चरितार्थ चालवितात. कर्फ्यूमुळे अनेक नाभिक कुटुंबांचे सलून व्यवसाय बंद आहेत. यात काही कारागीर बांधवाचा देखील सामावेश आहे अशा अनेक कुटुंबावर आता उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. या गंभीर परिस्थितीत दोंडाईचा शहरातील नोकरदार असलेला नाभिक वर्ग आपल्या समाजबांधवांच्या मदतीसाठी सरसावला आहे.त्यांनी दोंडाईचा शहरातील ६० कुटुंबांना  किराणा साहित्य घरपोच वाटप केले. समाजातील व्यावसायिक व व्यापाऱयांनी देखील शक्य ती मदत केली. यावेळी शिंदखेडा तालुकाध्यक्ष रवींद्र चित्ते, सचिव अनिल ईशी, दुकानदार संघाचे शहर अध्यक्ष किरण सुर्यवंशी, सा. समाजशीलचे दोंडाईचा प्रतिनिधी समाधान ठाकरे,गणेश पवार, सुनील सैंदाणे, योगेश मिस्तरी, जगदिश ईशी इत्यादी उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *