कवठे येमाईत ३ जण कोरोना पॉझिटिव्ह – शिरूर तालुक्यात खळबळ 

2524
कवठे येमाई,शिरूर : (सुभाष शेटे) – मुंबई येथुन शिरूर तालुक्यातील  कवठे येमाई  येथे दाखल झालेल्या  चार जणांपैकी  तिघांचा  कोरोनो अहवाल पॉजिटिव्ह आला असुन त्यांना सोडणारा आंबेगाव तालुक्यातील साकोरे येथील जावई बापु व लेकीलाही कोरोनाची लागण झाली असल्याने शिरूर सह आंबेगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. जनतेने घराबाहेर पडु नये दक्षता घ्यावी व घरातच थांबावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी केले आहे.

याबाबत कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ राजेश कट्टीमणी यांनी सांगितले की, शुक्रवार दि . १५ रोजी मुंबई (घाटकोपर) येथुन दोन लहान नातीना घेऊन आजी आजोबा रात्री आंबेगाव तालुक्यातील साकोरे येथील जावयाच्या गाडीत बसुन सकाळच्या सुमारास कवठे गावात आले. त्यांना कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर सोडून हा जावई गाडीसह पसार झाला.
या आजी आजोबांचा मुलगा हा मुंबई येथे चालक असुन त्याला कोरोनोची लागण झाली त्यामुळे त्यांच्या पत्नीलाही चाचणी साठी आरोग्य विभागाने मुंबईतच ताब्यात घेतले असून त्यांना ही कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळाली असल्याचे डॉ.कट्टीमनी यांनीआज दिली. मुंबईतच घरामधे राहणार दोन मुली व आजी आजोबा रात्रीत जावयांला सोबत घेऊन मुळ गाव असलेल्या शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे घेऊन आले. ही बातमी गावात समजताच जागृत ग्रामस्थ व वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना संस्थात्मक क्वांरंटाईन केलेमात्र मुबंईत दवाखान्यात दाखल असलेल्या त्यांच्या मुलाचा व सुनेचा कोरोना आवहाल पॉझिटिव्ह आल्या नंतर संशय आल्याने येथील चौघांना औंध येथील जिल्हा रुग्णालयात रविवारी पाठविण्यात आले.दरम्यान मुंबईत उपचार घेत असलेला आजोबांचा मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ.कट्टीमनी यांनी आज दिली.  पुण्यात दाखल केलेल्या त्यांचौघापैकी आजी ,आजोबा व एका मुलीचा चाचणी अहवाल पॉजिटिव्ह आला आहे . तसेच जावाई,मुलगी ही  ही पॉजिटिव्ह आले . त्यामुळे कवठे येमाई परीसरात व तालुक्यात  चिंतेचे वातावण निर्माण झाले आहे. शिरूरच्या पश्चिम भागात मागील दोन महिन्यापासून नागरिक योग्य ती दक्षता घेत असताना मुंबई येथून कवठे येमाईत आलेल्या ४ पैकी ३ जण कोरोनाग्रस्त असल्याचे समाजतातच चिंता वाढली आहे. 
याबाबत तहशिलदार लैला शेख यांनी तत्काळ प्रशासनाला योग्य त्या सुचना दिल्या आहेत . सध्या मुंबई मधुन मोठ्या प्रमानात लोक गावाला रात्री बेरात्री अनेकदा कोणतीही परवानगी न घेता गावाला येत असुन , ते प्रशासनाला माहीती देत नाहीत चार दिवसा पुर्वी टाकळी हाजी मधे ही १२ लोक मुंबईमधुन दाखल झाले त्यांना तत्काळ ग्रामसेवक राजेश खराडे यांनी त्यांना क्वांटाईन केले आहे .
त्यानंतर पुणे ग्रामिणचे पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी तत्काळ मुबई पुणेकव परप्रांतीय साठी छुपा रस्ता ठरलेल्या टाकळी हाजी येथे नगर पुणे जिल्हा सिमेवर राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी नेमली .
शिरूर तालुक्यांच्या पश्चिम भागातील मोठ्या प्रमानात नागरीक  मुंबई मधे कामा धंद यानिमित्ताने असुन ते मोठ्या संख्येने छुप्या मार्गाने पोलिसांची नजर चुकवत गावाला आले आहेत मात्र त्यांनी स्वतः क्वारंटाईन होने आवश्यक आहे . ते आल्याची माहीती ग्रामसेवक व आरोग्य विभागाला दिली जात नाही . उलट त्यांचे नातेवाईक जनतेमधे फिरत राहतात त्यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो .




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *