प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळेलाच प्राधान्य – कवठे येमाईत ३०० विद्यार्थी घेतात प्राथमिक शिक्षणाचे बालकडू

336
शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – आजकाल ग्रामीण भागात ही सर्वसामान्य कुटुंबातील पालकांचा ऐपत नसताना ही आपल्या पाल्यांना बालपणापासूनच इंग्रजी शिक्षण मिळावे म्हणून धडपड सुरु असल्याचे चित्र पाहावयास मिळते. पण अनेक जिल्हा परिषद शाळा बालकांना संस्कारिक अध्यापनाचे धडे देऊन घडविण्याचे काम करत असल्याचे ही आपणास पाहावयास मिळते. त्याचेच एक उदाहरण म्हणजे पुणे जिल्हा परिषदेची शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावठाणातील प्राथमिक शाळा होय.
        कवठे येमाई जिल्हा परिषद शाळा खूप जुनी शाळा. हजारो विद्यार्थ्यानी याच शाळेत शिक्षणाचा श्रीगणेशा करून उच्चशिक्षित होत गावचे,शाळेचे नाव उंचावले आहे.काळानुसार शिक्षण पद्धतीत बदल होत गेला.पण योग्य अध्यापन देत संस्कारिक विद्यार्थी घडविण्याचे काम प्राथमिक शाळेतून निरंतर सूरु असल्याचे पाहावयास मिळते.
 कवठे येमाई प्राथमिक शाळेत १ ली ते ७ वि पर्यंतचे वर्ग,३०० विद्यार्थ्याची पटसंख्या,११ शिक्षकी शाळा असून ही मुख्याध्यापकाची जागा रिक्तच. असे असले तेरी उर्वरित १० शिक्षक,शिक्षिका आपल्यावर अध्यापनाची असलेली जबाबदारी योग्यरीतीने सांभाळत प्रत्येक वर्गात,विद्यार्थ्यांकडे कटाक्षाने लक्ष देत या बाल विद्यार्थ्याना अधिकाधिक चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सांभाळत असलेले शांताराम पोकळे हे स्वत:जातीने लक्ष देत असून शाळेसह विद्यार्थ्यांचा सर्वागींण विकास व्हावा म्हणून प्रयत्नशील असताना दिसून येतात.
    योग्य अध्यापना बरोबरच शाळेतील बाल विद्यार्थ्याना कवायत,योग शिक्षण,बाळ संस्कार,वेळोवेळी निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,कथाकथन,पाढे पाठांतर हे उपक्रम शाळेत प्राभावीपने राबवत असल्याचे सखाराम फंड,शरद भोर या शिक्षकांनी सा.समाजशिलशी बोलताना सांगितले. या प्राथमिक शाळेत मिळणारे गुणवत्तावान शिक्षण यामुळेच कवठे येमाई गावठाणातील शाळेत मुलांना प्रवेश घेण्याकडे अधिकाधिक कल असल्याचे ग्रामपंचायत सदस्य मधुकर रोकडे,सामाजिक कार्यकर्ते रितेश शहा,बबनराव जाधव यांनी सांगितले. तर शाळेचा पट यावर्षी ३०० झाल्याने ग्रामस्थांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *