घोड़गंगा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन, शिरूर वकील बार असोसियनचे माजी अध्यक्ष रंगनाथ थोरात यांचे निधन       

795
शिरूर,पुणे : (सा.समाजशील वृत्तसेवा)– शिरूर तालुक्यातील आमदाबाद  येथील रंगनाथ थोरात यांचे आज दि. ०२ ला निधन झाले मागील काही दिवसांपासून ते पुण्यातील रुग्णालयात उपचार घेत होते. मृत्यू समयी ते ६२ वर्षांचे होते.
  काही दिवसांपूर्वी नगर -पुणे हायवेवरील शिरूरु जवळील बोऱ्हाडे मळा येथे त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. पुण्यात उपचारा दरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला. थोरात यांनी राजकीय, सामाजिक, वकील अशी विविध क्षेत्रात अनेक पदे भूषविली आहेत. अतिशय मनमिळावू असलेले व शिरूर तालुक्यातील प्रत्येकाच्या सुखदुखात सामील होणारे तसेच माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील,  शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, आमदार अशोक पवार यांचे ते एकनिष्ठ कार्यकर्ते होते. त्यांच्या मृत्यूने शिरूर तालुक्यात हळहळ व्यक्त असून चांगला सहकारी गमावल्याची भावना मिठूलाल बाफणा व नागरिकांमधून व्यक्त होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *