विमानसेवेदरम्यान गेल्या 2 दिवसांत पुण्यात 1 हजार 167 प्रवाशांचे आगमन   

332

पुणे (-प्रतिनिधी, सचिन दांगडे) : देशांतर्गत विमानसेवेला 25 मे पासून सुरुवात करण्यात आलेली आहे. 25 मे रोजी पहिल्याच दिवशी 11 विमानाने 823 तर, 26 मे रोजी 8 विमानाने 344 प्रवासी असे एकूण 1 हजार 167 प्रवाशांचे पुणे विमानतळावर आगमन झालेले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. देशांतर्गत 25 मे पासून सुरू करण्यात आलेल्या विमानसेवेदरम्यान, गेल्या 2 दिवसांत पुण्यात 1 हजार 167 प्रवाशांचे आगमन झाले आहे. पुणे विमानतळावर उतरणाऱ्या या प्रवाशांना पुणे महानगरपालिकेमार्फत थर्मल स्क्रिनिंग तसेच होम क्वारंटाईन सील ॲन्ड हेल्प डेस्कची सुविधा 24X7 करण्यात आली आहे.  पुणे विमानतळ येथे उतरणाऱ्या नागरिकांबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांची तर त्यांच्या सहाय्याकरीता प्र.सहाय्यक जनसंपर्क अधिकारी योगेश हेंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *