विदयाधाम शिक्रापूर मध्ये गरजू विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनी वाटप व नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान

353
शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : विदयाधाम प्रशाला शिक्रापूर येथे शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान तसेच रोटरी क्लब च्या वतीने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनी चे वाटप करण्यात आले. नुकतीच शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली. यामध्ये संस्थेचे अध्यक्ष म्हणून अनिल बोरा (मा.CEO सेंटर फार्मासिटिकल, हिंजवडी पुणे, 15 व रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल) व सचिव म्हणून चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरूर चे माजी प्राचार्य नंदकुमार निकम सर निवड झाली. तसेच विदयाधाम प्रशाला शिक्रापूर शाखाच्या चेअरमन पदी प्रकाश बोरा यांची निवड झाली.
यांचा सन्मान प्रशालेच्या वतीने प्राचार्य रामदास चव्हाण सर, उपप्राचार्य दहिफळे सर व पर्यवेक्षक पाचकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच यावेळी प्रशाले मधील गरजू विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीचे वाटप रोटरी क्लब च्या वतीने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अनिल बोरा यांनी भूषविले तर या कार्यक्रमाला शिरूर बाजार समिती चे संचालक व शिक्रापूरचे मा.उपसरपंच धर्यशील मांढरे, समता परिषदेचे सोमनाथ भुजबळ, प्रशाला शिक्षकपालक संघाचे अध्यक्ष सुनील मांढरे, रोटरी क्लब शिक्रापूर चे अध्यक्ष लध्दाराम पटेल, प्रीतम शिर्के व मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात अनिल बोरा यांनी प्रशालेच्या प्रगतीसाठी, संस्था लागेल ती मदत करायला नेहमी तयार असेल असे आश्वासन दिले. तर सचिव निकम सर यांनी बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांचा ज्ञान ग्रहणाचा आवाका प्रचंड वाढला आहे. त्या वेगाने त्यांना शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी सुद्धा पुर्ण तयारीने व आधुनिक शैक्षणिक साधनांसह सज्ज झाले पाहिजे असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रामदास चव्हाण यांनी केले तर सुत्रसंचलन दिगंबर नाईक सर व ज्ञानेश्वर कुंभार सर यांनी केले. पर्यवेक्षक पाचकर सर यांनी आभार मानले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *