शिक्षक आमदार आसगावकर याच्यासमावेत सहविचार बैठक संपन्न

448

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : सेन्ट्रल बिल्डींग(शिक्षणसंचालक कार्यालय) येथे पुणे विभाग शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर सर यांची शिक्षण संचालक  दत्तात्रय जगताप यांचे समवेत सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर,  शिक्षण उपसंचालक डाॅ. वंदना वाहूळ, प्रशासकीय अधिकारी, ज्योती शिंदे व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे समन्वयक तथा पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष दादासाहेब गवारे यांनी अघोषित शाळा अनुदान, वरीष्ठ व निवडश्रेणी, नियमित पगार, D.C.P.S. खाते, शालार्थ आ.डी. या सह विविध प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षकेतर महामंडळाचे सहकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी शिक्षकत्तरांचे विविध प्रश्न मांडले. अनुकंपाखालिल शिक्षक भरती, प्रलंबित बीले या विषयी प्रश्न उपस्थित केले. यावेळी बहुसंख्येने शिक्षक, बंधुभगिनी उपस्थित होते. पहिल्याच सभेत आमदार असगावकर सर यांच्या अभ्यासपूर्ण विचाराने प्रशासनावरील पकड सिद्ध झाली.यावेळी अधिकाऱ्यांनाही जागेवरच अनेक प्रश्न सोडविले. आमदार साहेबांनी अनेकांची मने जिंकली. नंतरही आमदार साहेबांनी सर्वांच्या समस्या समजून घेतल्या. संस्थाचालक प्रकाश थोरात यांनीही समाधान व्यक्त केले.यावेळी पिंपरी चिंचवड माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष भोसले सर, प्राचार्य स्वाती थोरात, शिवाजी पाखरे सर, शिंदे सर, मोरे सर, विठ्ठलवाडी गावचे माजी सरपंच बाळासाहेब गवारे अवर्जुन उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *