शिक्रापूर,शिरूर : वास्तववादी अभिनयातुन कला क्षेञात आपले स्थान भक्कम करण्यासाठी रंग भुमी ही जन्मदाञी आहे” सिनेनाट्य अभिनेता – सुशांत शेलार

572
        शिक्रापूर,शिरूर : वास्तववादी अभिनयातुन  कला क्षेञात आपले स्थान भक्कम करण्यासाठी रंग भुमी ही जन्मदाञी आहे”  असे मत सिनेनाट्य अभिनेता सुशांत शेलार यांनी व्यक्त केले.
         शिरुर येथे दोन दिवशीय नाट्य एंकांकिंका स्पर्धेचा समारोप प्रसंगी ते बोलत होते. अखिल भारतीय नाट्य परिषद शिरुर ता.शाखा आयोजित राज्य स्तरीय नाट्य एंकांकिका स्पर्धेचा समारोप शिरुर येथे झाला .कार्यक्रमाचे स्वागतपर प्रस्ताविक नाट्य परिषदेच्या शिरुर तालुकाध्यक्षा अध्यक्षा  दिपालीताई शेळके यांनी केले. शालेय अभ्यासक्रमात सुध्दा नाट्य अभिनयाचा समावेश असावा अशी अपेक्षा शेळके यांनी व्यक्त केली.
          कार्यक्रमाला सिनेनाट्य अभिनेते सुशांत शेलार, नाट्यपरिषदेचे सचिव सतिश लोटके,नियामक मंडळाचे सदस्य सतिश शिगटे, कोथरुड शाखेचे सुनिल महाजन,पिंपरी चिंचवडचे भाऊसाहेब भोईर, सचिन सावंत,तळेगाव दाभाडे शाखेचे सुरेश धोञे, जि.प.चे माजी अध्यक्ष  प्रदिप कंद,तळेगाव गटाच्या सदस्या रेखा बांदल, क्रांतीवीर प्रतिष्टानचे संजय पांचगे,नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत धापटे,कोषाध्यक्ष बाळासाहेब शेळके,शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष दादासाहेब गवारे ,कार्यकारिणी सदस्य व सा.समाजशील व न्यूज नेटवर्कचे पत्रकार राजाराम गायकवाड व अन्य मान्यवर उपस्थित होते .कार्यक्रमाचे सुञसंचालन प्रा.संजीव मांढरे यानी केले.यावेळी मुंबई येथील कलासक्ती संस्थेच्या ‘दर्दपोरा’ या एंकांकिकेला प्रथम क्रमांक मिळाला. आचार्य प्र.के. अञे करडक मिळाला. या शिवाय वेगवेगळ्या क्षेञात विविध प्रकारची बक्षिसे देण्यात आली .यामध्ये राज्यातुन अनेक संघानी भाग घेतला. यामध्ये पुणे,शिरुर ,चाकण ,नाशिक,कोल्हापूर सातारा,मुंबई या भागातुन संघ आले होते .परिक्षक म्हणून विश्वास देशपांडे, संतोष रासने यांनी काम पाहिले. आभार यशस्वी वेल्फेअर च्या सदस्या नम्रता ताई गवारे यांनी मानले.
– प्रतिनिधी, राजाराम गायकवाड,(स.समाजशील,शिक्रापूर )
  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *