कवठे येमाई,शिरूर : कवठे येमाईत जागतिक महिलादिन उत्साहात साजरा,महिला ग्रामपंचायत सदस्यांसह महिलांचा सन्मान,ग्रामपंचायतीने केले कार्यक्रमाचे आयोजन,महिलांच्या सन्मानाने समाधान – मनीषा गांधी

793
         कवठे येमाई,शिरूर : कवठे येमाई ग्रामपंचायतीत आज जागतिक महिलादिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित महिला ग्रामपंचायत सदस्यांसह इतर ही  महिलांचा ग्रामपंचायतीच्या वतीने प्रतिमा काळे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
         यावेळी कवठे ग्रामपंचायतीचे सरपंच अरुण मुंजाळ,ग्रामपंचायत सदस्या मनीषा गांधी,आशा शितोळे,सुरेखा इचके,साधना पोकळे,प्रतिमा काळे,सागर रोहिले,बबनराव बाळू पोकळे,ग्रामसेवक रोकडे व ग्रा.पं. कर्मचारी उपस्थित होते. ग्रामपंचायतीने आज महिलादिनी प्रथमच आम्हा महिला सदस्य व महिलांचा सन्मान केल्याबददल सद्स्या मनीषा गांधी यांनी ग्रामपंचायतीस धन्यवाद दिले. तर या सन्मानाबद्दल सदस्या आशा शितोळे यांनी देखील समाधान व्यक्त करीत पुरुषांच्या बरोबरीने ग्रामीण भागातील महिलांना ही योग्य त्या सन्मानाची वागणूक मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
संपादक,देवकीनंदन शेटे,(सा.समाजशील)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *