शिरूर,पुणे : शिरूर शहरामध्ये जागतिक महिला दिन आगळ्यावेगळ्या उपक्रमाने साजरा, आज कन्यारत्न झालेल्या मातांचा सन्मान,यशस्वीनी वेल्फेअर फाऊंडेशनचे आयोजन

598
         शिरूर, पुणे : शिरूर शहरामध्ये जागतिक महिला दिन आगळ्यावेगळ्या उपक्रमाने साजरा करण्यात आला. आज महिलादिनी येथिल ओंकार हॉस्पिटलमध्ये ज्यांना कन्यारत्न झाले अशा मातांचा व बाळांचा सन्मान करण्यात आला. बाळाला कपडे व आईला साडी देऊन आज जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
           तर  सायंकाळी ४ वा.शिरूर येथील मतीमंद मुलींच्या शाळेमध्ये मान्यवर महिलांनी जाऊन तेथील मुलींना चिक्कू,फरसाण,रवा,तूप व इतर खाऊ वाटप करून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.   कार्यक्रमाचे नियोजन यशस्वीनी वेल्फेअर फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले.
            यावेळी यशस्वीनी वेल्फेअर फाऊंडेशनच्या सचिव,नम्रताताई गवारे,पोलिस मित्र समन्वय उपाध्यक्ष पुष्पाताई जाधव,पोलिस मित्र समन्वय शहराध्यक्ष ललिताताई कुरूंदळे,अखिल भारतीय मराठा महासंघ महिला तालुकाध्यक्ष,वर्षाताई काळे,मनसे महिला शहराध्यक्ष शारदाताई भुजबळ,शिरुर नगर परिषदेच्या नगरसेविका संगीताताई मल्लाव,सामाजिक कार्यकर्त्या परविन शेख, रेश्माभाभी शेख, सुप्रियादीदी ओमशांती,प्रमिला शिरसट,स्नेहा बिरगर,जनाबाई मल्लाव,कल्पना ताई,शिवानी,पायल,रुपाली,निशा,चंदनाताई गायकवाड,सत्वशीलाताई पांडे,अविनाश घोगरे (मनविसे शहराध्यक्ष ),शैलेश जाधव (हुडको कॉलनीचे संघटक ),विकास साबळे (मनविसे उपाध्यक्ष),प्रविण तुबाकी ( मनविसे उपाध्यक्ष),प्रसन्न भोसले (मनविसे विभाग अध्यक्ष ),फैजलभाई शेख ( मनविसे विभाग अध्यक्ष ),उमेश शेळके (अखिल भारतीय मराठा महासंघ,उपाध्यक्ष),विलास वीर,(मनविसे उपविभाग अध्यक्ष),
अनिकेत घोगरे (युवा नेते),आमर झेंडे (युवा नेते),ऋषीकेश घोगरे(मनविसे शाखा उपाध्यक्ष),आकाश भालेराव (युवा नेते),प्रणव गुरव,ओम ठाकूर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
– प्रा.सुभाष शेटे,(कार्यकारी संपादक,सा.समाजशील)
 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *