शिरूर तालुक्यात महावितरणचे विशेष अभियान ; मोटारसायकल रॅलीतून विविध उपक्रमांची दिली माहिती

324

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शिक्रापूर येथे महावितरणच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन व सहायक अभियंता बसवराज बिराजदार, दीपक पाचुणकर, अशोक पाटील, दादा बारवकर, श्रीकांत ताटीकोंडा, विजय शेरकर व इतर सर्व शाखांचे कर्मचारी उपस्थित होते. या रॅलीमध्ये वीज चोरी विषयी प्रबोधन करण्यात आले. तसेच नवीन वीज कनेक्शन ची माहिती, सोलार कनेक्शन याबाबत माहिती देण्यात आली. तसेच या अभियानांतर्गत प्रत्येक शाखेतील एक गाव निवडले असून, त्या गावातली सर्व देखभाल दुरुस्ती वीज बिल दुरुस्ती, नवीन वीज कनेक्शन देणे व विजे संबंधित असणाऱ्या अडचणी बाबत तक्रार निवारण करण्यात येणार आहे. तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून सर्व शाखा कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र व शाखा कार्यालयाजवळ वृक्षारोपण करण्यात येणार आहे. सदरचे आयोजन हे माननीय मुख्य अभियंता श्री पावडे यांच्या संकल्पनेतून व माननीय अधीक्षक अभियंता श्री पाटील व माननीय कार्यकारी अभियंता श्री एडके मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *