स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून देवगाव केंद्र शाळेत विवीध कार्यक्रमाचे आयोजन

450

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा देवगाव ता.मुरबाड  येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना प्रशासकीय यंत्रणेतील पोलिसांतील माणूस या विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुरबाड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना पोलीस दलात सामील होऊन देशाची सेवा करावी व आईवडिल गुरुजनांचा सन्मान कसा राखावा या बाबत मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थी व शाळेचे कौतूक केले तर याचं शाळेतील सैन्य दलात देशसेवा बजावत आसलेल्या अनिकेत अढाईगे यांचा सत्कार करून विद्यार्थ्यांना एक आदर्श दिला. तर याचं शाळेत शिकलेले सेवानिवृत्त सैन्य दलातील मेजर जयवंत तुपे यांच्या हस्ते ध्वजारोहन करून नवीन पायंडा या शाळेने दिला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने विवीध स्पर्धा आयोजनात पालक व विद्यार्थी नागरिकांचा सहभाग घेतला जात आहे. त्यातून घोषवाक्य स्पर्धा व राष्ट्रध्वज रंगभरण स्पर्धेचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांबरोबर बरोबरच पालकांनीही सहकार्य केले. अनेक विद्यार्थांनी स्पर्धेत विजय मिळवला. शालेय शिक्षणाबरोबरच सहशालेय उपक्रम सदर शाळेत वारंवार राबविले जात असतात. त्यामुळे गावाच्या व  शाळेच्या चारही बाजुला इंग्रजी माध्यमाच्या शाळा असुनही गेल्या तीन वर्षात शाळेचा पट 159  वरून 232 पर्यंत गेला आहे. इयता 1 ली ते 7 वी पर्यंतचे सर्व वर्ग सेमी इंग्रजीचे आहेत. तसेच विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या मान्यवरांचे मार्गदर्शन व मदतही मिळवून दिली जात आहे. यावेळी पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या हस्ते मुलांना बक्षिस वितरण करण्यात आले. झालेल्या कार्यक्रमांसाठी पोलिस निरिक्षक प्रसाद पांढरे तसेच त्यांच्या समवेत पोलीस ना.विनायक खेडकर, देवगाव ग्रामपंचायतच्या सरपंच अंजना भांडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सविता तुपे, पोलीस पाटील गणेश तुपे,  सीटू कामगार संघटनेचे दिलीप कराळे व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व व्यवस्थापन मुख्याध्यापक एकनाथ देसले सर तर सुत्रसंचलन नितीन घागस सर यांनी केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक डॉ. निलकंठ व्यापारी सर, नंदिनी सरनोबत मॅडम, पौर्णिमा भोईर मॅडम, प्रतिमा नागरगोजे मॅडम यांनी केले. डॉ. निलकंठ व्यापारी यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *