PMPML ने ग्रामीण भागातील एक दिवसाचे पास पुन्हा सुरु करावे -प्रवाशांची मागणी 

334

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : पी.एम.पी.एम.एल.ने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक दिवसाचा पास सुरु केला होता. परंतु काही कारणामुळे पास सुविधा बंद करण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पैसे आकारावे लागत होते. PMPML ने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी लांब पल्याच्या बससेवा ही सुरु केल्या आहेत. त्याला प्रवाशी वर्गाचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु कोणतीही पुर्वकल्पना न देता एक दिवसाचे पास बंद केले. संबधित खाते तोट्याचे कारण दाखवत असले तरी एका दिवसाच्या पासची रक्कम वाढवा पण पास पुन्हा सुरु करा अशी मागणी प्रवासीवर्गाकडून होत आहे. शहरातील नागरिकांना दिवसभराच्या पासची सोय असून, ग्रामीण भागातून  पास माञ बंद केले आहे. यामुळे सामान्य नागरिक, कामगार वर्ग यांचे अतोनात हाल होत आहे. तरी PMPML ने गांभीर्यांने लक्ष देण्याची गरज असून लवकरात लवकर पास सुरु करावा असे शिक्रापूर येथील ग्रामपंचायत सदस्या पुजा भुजबळ यांनी  समाजशील शी बोलताना सांगितले. तसेच याबाबत शिरुर हवेलीचे आमदार अँड.अशोक पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे देखील सांगितले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *