रोटरीच्या शिरुर तालुका अध्यक्षपदी कंरजे यांची तर सचिव पदी भोसुरे यांची निवड

310

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : रोटरी क्लब ऑफ शिक्रापूरचा ९ वा नूतन पदग्रहन सोहळा आज हॉटेल पालमार्क्स येथे संपन्न झाला. रोटरी वर्ष 2022-2023 मधील प्रेप्सिडेंटपदी रो.वीरधवल करंजे तर सेक्रेटरी म्हणून रो.डॉ.मिलिंद भोसुरे यांची नियुक्ती करण्यात आली. मावळते अध्यक्ष रो.रमेश भुजबळ व सचिव रो.मनोहर परदेशी यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. तसेच सर्व बोर्ड ऑफ डायरेक्टर्स यांची नियुक्ती जाहीर झाली. याप्रसंगी रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे 2024-2025 चे प्रांतपाल रो.शीतल शहा, सहाय्यक प्रांतपाल रो.विलास काळोखे, आमदार अशोकबापू पवार, मा.आमदार सूर्यकांत पलांडे, मा.सरपंच आबा करंजे,उपसरपंच मयूर करंजे, मा.उपसरपंच रमेश थोरात व बोर्ड ऑफ डायरेक्टर मधील रो.मच्छीन्द्र गायकवाड, रो.लधाराम पटेल,रो.प्रीतम शिर्के, रो. रमेश भुजबळ, रो.रवींद्र भुजबळ, रो.मनोहर परदेशी, रो.डॉ. रामदास पोटे , डाँ अविनाश रुके, रो.डॉ. शरद लांडगे, रो.बाजीराव भाकरे व सर्व रोटरी सदस्य उपस्थित होते. त्यावेळेस यावर्षीच्या घेणाऱ्या नवीन प्रोजेक्ट संदर्भात माहिती देण्यात आली. काही उल्लेखनीय व्यक्तींचा त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सत्कार करण्यात आला त्यामध्ये रो.मयूर करंजे, डॉ. विवेक भोसुरे, रो. संजीव मांढरे सर, रो.मनोहर परदेशी सर, रो. डॉ. शरद लांडगे यांचा समावेश होता. यावेळी 17 नवीन झालेल्या सदस्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ शिक्रापूरचे कार्य प्रशंसनीय असून तळागाळातील लोकांपर्यंत पोहचण्यात क्लब यशस्वी झाला आहे असेल प्रतिपादन याप्रसंगी आमदार अशोक पवार यांनी केले. सर्व उपस्थित मान्यवरांनी क्लब ला आशीर्वाद दिले व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. रो.संजीव मांढरे यांनी प्रास्ताविक केले तर रो.मयूर करंजे यांनी आभार मानले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *