मुरबाड राष्ट्रवादीला नवी उभारी मिळणारं – शैलेश वडणरे यांची मुरबाड विधानसभा अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर ग्वाही

323
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुका हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणुन ओळखला जायचा मात्र राष्ट्रवादी काँग्रेस माजी आमदार गोटिराम पवार यांचे पुत्र सुभाष पवार यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडले. तर माजी आमदार गोटिराम पवार यांनी आजपर्यंत तटस्त भूमिका ठेवल्याने मुरबाड राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला होता.मुरबाड राष्ट्रवादीचे सर्व सूत्र प्रमोद हिंदुराव यांच्या हाती सोपविन्यात आले असताना विधानसभा व मुरबाड नगरपंचायत निवडणुकीत अपयशाला सामोरे जावे लागले.मात्र आता मुरबाड विधानसभा क्षेत्राची जबाबदारी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या बदलापूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक  शैलेश वडनेरे यांची मुरबाड विधानसभा अध्यक्षपदी निवड केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस ला उभारी मिळणारं असल्याचे कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे. शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शैलेश वडनेरे यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला असतां त्यांना मुरबाड विधानसभेची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांनतर त्यांनी मुरबाड विधानसभेत सर्व पदाधिकारी व पत्रकारांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला उभारी देऊन पुन्हा मुरबाडला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनवणार अशी माहिती दिली. शिवसेनेतील आक्रमकतेचा पक्ष वाढीसाठी उपयोग होईल तर सर्वांना एकत्र घेऊन पक्षाला उभारी देणार अशी ग्वाही दिली. तर त्यांना कितपत यश येणार हे आगामी काळात पहायला मिळणार आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *