देवगाव ग्रामपंचायत नळपाणी पुरवठा योजनेद्वारे अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

355

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड शहरालगत असलेल्या देवगाव गावात काही मागील पाच वर्षापूर्वी 45 लाख रूपये खर्चून नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करण्यात आली. मात्र आजपर्यंत या नळपाणी योजने द्वारे होणारा पाणी पुरवठा हा गढूळ व अशुद्ध असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नागरिकांनी अनेक वेळा शुद्ध पाणी पुरवठा व्हावा याची मागणी केली. मात्र याबाबत कुठलीही ठोस कारवाई न झाल्याने नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते किंवा खाजगी बोअरवेल असणाऱ्या नागरिकांकडून पाणी विकत घ्यावे लागते. अनेक खाजगी बोअरवेल ह्या शेत घराच्या योजनेतून घेतल्याचे सांगितले जाते. नुकतेच मुरबाड नगरपंचायत चे नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे यांनी मुरबाड नगरपंचायत माध्यमातून शुद्ध पाणी पुरवठा देणार अशी घोषणा केली. मात्र त्यासाठी किती कालावधी लागेल हे मात्र नक्की नसल्यानें आणखी किती काळ पाण्यासाठी वणवण भटकावे लागते हा प्रश्र्न प्रलंबित आहे. देवगाव हे मुरबाड शहर व राष्ट्रीय महामार्ग लगत असून, राष्ट्रीय महामार्ग ते गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर साधी रोडलाईट नसल्यानें शहरा लगत गाव असूनही आज ही प्राथमिक सुविधांचा वणवा दिसत आहे. सध्या तालुक्यात थंडी, ताप, सर्दी, खोकला, टायफाईड, मलेरिया सारख्या आजाराचे रूग्ण आढळत असून, पिण्या योग्य पाणी मिळत नसल्याने देवगाव ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *