घोडगंगा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची कवठे येमाईस भेट

617
शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील रावसाहेबादादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाण्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलच्या प्रचारास,मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रारंभ करण्यात आला असून त्याच पार्श्वभूमीवर आज शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या.
    श्री येमाई माता सभागृहाच्या पारावार झालेल्या छोट्याशा कार्यक्रमात पुणे जिल्हा परिषदेच्या माजी कृषी सभापती सुजाताभाभी पवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रवीबापू काळे,शिरूर पंचायत समीतीच्या माजी सभापती मोनिकाताई हरगुडे,घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक नरेंद्र माने,तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालिका सुजाता नरवडे,टाकळी हाजीचे माजी सरपंच सोपानराव भाकरे,शिरूर पंचायत समितीचे माजी सदस्य सुदामभाऊ इचके,डॉ.कल्पनाताई पोकळे,रामदास सांडभोर,रितेश शहा,पांडुरंग भोर,गणेश रत्नपारखी,रामदास माळवदे व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
           राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,कारखान्याचे अध्यक्ष आमदार अशोकबापू पवार यांच्या नेतृत्वाखाली रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाण्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारास मतदारांच्या गाठी भेटी घेत प्रारंभ करण्यात आला आहे.  दि. १८ जुलै पर्यंत अर्ज  माघार,१९ ते ३१ जुलै प्रचार,व ३१ जुलै रोजी मतदान होणार असल्याचे रवीबापू काळे यांनी सा.समाजशील शी बोलताना  सांगितले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *