यंदाच्या जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी मुरबाड पंचायत समिती मधुन गुणवंत शिक्षकांच्या फाईल पाठवण्या संदर्भात राजकीय हस्तक्षेप होत असल्याने शिक्षक संघटना आक्रमक

314
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : शैक्षणिक वर्ष 2022-23  जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे यांच्याकडून पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातून मागविण्यात आल्या. मात्र मुरबाड तालुक्यातून जिल्हा पुरस्कारासाठी आतापर्यंत चार फाईल पंचायत समिती शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या. पंचायत समिती मुरबाड यांच्या स्तरावरुन जिल्ह्यास तीन फाईल पाठवण्यात आल्या. तर चौथी फाईल ही डॉ.प्रशांत तुकाराम माळी या शिक्षकाची असून, ही फाईल न पाठवण्याबाबत राजकीय हस्तक्षेप होत असल्याने शिक्षक वर्ग आक्रमक झाले असून, सदर प्रस्ताव न पाठवल्यास कार्यालया बाहेर उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला आहे.
डॉ.प्रशांत तुकाराम माळी हे तालुक्यांतील जि.प.शाळा दहिगावं येथे कार्यरत असुन त्यांचे शैक्षणिक, सामाजिक कार्य उत्तम असताना जिल्हा परिषद ठाणेकडून पंचायत समितीस प्राप्त झालेल्या निकषामध्ये डॉ प्रशांत माळी परिपूर्ण असतानाही जाणीवपूर्वक त्यांच्या नावाचा प्रस्ताव पंचायत समिती मुरबाडकडून न पाठवल्याने राजकीय हस्तक्षप होत असल्याचा आरोप होत आहे. गेल्या दोन तीन वर्षापासून मुरबाड पंचायत समितीकडून तालुका पुरस्कार व जिल्हा पुरस्कारासाठी एका ठरावीक वर्गाकडून हस्तक्षेप होत असल्याचा आरोप होत आहे. त्यास पंचायत समिती आणि प्रशासकीय यंत्रणा हे साथ देत असल्याचं दिसत असल्याने सर्व डॉ माळी यांना न्याय न मिळल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन छेडले जाईल असा इशारा शिक्षक वर्गाने दिला असून, याबाबत खासदार व केंद्रिय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, मुख्यकार्यकारी अधिकारी ठाणे, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष, गटविकास अधिकारी मुरबाड यांना निवेदन देवून इशारा दिला आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *