नीरा नरसिंहपूर,इंदापूर : गोंदी ते पिंपरी गिरवी आडवा वस्ती रस्ता चार कोटी 55 लाख व पिंपरी ते वजरे रस्ता दोन कोटी 85 लाख या कामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न

853
       नीरा नरसिंहपूर,इंदापूर : तालुक्यातील गोंदी ते पिंपरी गिरवी आडवा वस्ती रस्ता चार कोटी 55 लाख व पिंपरी ते वजरे रस्ता दोन कोटी 85 लाख या कामांचा भूमिपूजन समारंभ खासदार सुप्रिया सुळे व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संपन्न झाला. यावेळी प्रवीण भैय्या माने, अप्पासाहेब जगदाळे, महारुद्र पाटील, अशोकराव पाटील, प्रदीप मामा जगदाळे, हनुमंतराव कोकाटे, यशवंतराव माने, अमोल राजे मोहिते पाटील, श्रीकांत बोडके पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली.
     कार्यक्रमा प्रसंगी नामदेव क्षिरसागर बोलताना म्हणाले की, शरद पवार साहेब व अजितदादा व सुप्रिया ताईंच्या माध्यमातून व  अशोक भाऊंच्या मार्गदर्शनाखाली गिरवी गावासाठी मोठ्या प्रमाणात निधी विकास कामासाठी प्राप्त झाला आहे.
       कार्यक्रमाप्रसंगी प्रवीण भैय्या माने म्हणाले की, पवार साहेबांच्या व अजितदादांच्या व ताईंच्या प्रयत्नातून या तालुक्याला रस्त्यासाठी असो कोणत्याही कामासाठी निधी मिळवून देण्याचं काम मोठ्या संख्येने उपलब्ध करून तालुक्याचा विकास केला मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रवास करावा लागतो त्या प्रवासाला सामोरे जाण्यासाठी त्यांच्या माध्यमातून या विद्यालयाला व तालुक्यातील सर्व ठिकाणी मुलींना सायकली मिळवून देण्याचे काम केले.
 दत्ता मामा भरणे-  आमदार
ताईंच्या, दादांच्या व पवार साहेबांच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले आहे. खासदार हा सर्वच कार्यकर्त्यांना हाताशी धरून कामे करणारा खासदार असावा पाच वर्षांमध्ये प्रत्येक गावात वाडी वस्तीवर जाऊन माणसांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांचे कामे केली.  अडचणीत आलेल्या त्या त्या माणसाचा प्रश्न कसा सोडवता येईल अडचणीतून मार्ग कसा निघेल व त्याची अडचण कशी दूर होईल हा विचार ताईंच्या मनामध्ये कायमस्वरूपी रुजलेला असतो. ताईने आपल्या तालुक्यासाठी निधी आणण्यासाठी मोठे सहकार्य केले आहे. साहेबांच्या व अजितदादांच्या व सुप्रियाताईंच्या सहकार्याने तालुक्यासाठी निधी कमी पडू देणार नाही.  मुलींसाठी सायकली दिल्या परंतु रस्त्याची अडचण समोर येताच  रस्त्याचे इस्टिमेट तयार करून त्यांच्या समोर ठेवून निधी मंजूर करून घेतला  म्हणूनच रस्त्याच्या भूमिपूजनाचा नारळ आज फोडला गेला. 
 सुप्रियाताई सुळे – खासदार
 केंद्रामध्ये  सरकारचा बदल झाला राज्यामध्ये देखील सरकार बदलले हे दोन्ही सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असून शेतकऱ्याला कोणतीही कर्जमाफी दिलेली नाही.  वर्षाला सहा हजार रुपये इतकीच मदत जाहीर केली.  पवार साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा राज्यांमध्ये कोणतीच अडचण शेतकऱ्याला येऊ दिली नाही.  ज्यावेळेस आपले सरकार येईल त्यावेळेस महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही चालू  काळामध्ये मुलींना सायकलीचा वाटप केलं परंतु मुलांसाठी इथून पुढे सायकली मिळवून देण्याचे काम केले जाईल असे आश्वासन ही दिले. अप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्केट कमिटी मध्ये शेतकऱ्यांच्या मालाला चांगल्या प्रकारचा भाव मिळवून देण्याचे काम करीत आहेत. मी आयुष्यभर तुमची ऋणी आहे.  ज्या योजना माझ्यापर्यंत येतील त्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम राज्यामध्ये करीन. 
या कार्यक्रमाप्रसंगी  तालुक्यातील व परिसरातील मान्यवर श्रीकांत दंडवते, अण्णा काळे, सोमनाथ मोहिते, राजेंद्र मोहिते, विजय क्षीरसागर, रेखा कोरे, गोवर्धन क्षीरसागर, मारुती क्षीरसागर, अरुण क्षीरसागर, मिनीनाथ क्षीरसागर, दादा क्षीरसागर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव क्षीरसागर यांनी केले तर सूत्रसंचालन दिलीप बागल यांनी केले.
– प्रतिनिधी,बाळासाहेब सुतार,(सा.समाजशील,नीरा नरसिंहपूर,इंदापूर)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *