पातूर येथील लिंबू उत्पादक शेतकरी लॉक डाउन आणि पावसामुळे आर्थिक संकटात

510
पातूर,अकोला (-प्रतिनिधी,श्रीधर लाड) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील सततची नापिकी आणि कर्ज बाजारी पणाला कंटाळून गेलेल्या शेतकऱ्यांवर नव्याने उभे झालेल्या कोरोना पार्शवभूमीवर झालेल्या लॉकडाऊन च्या संकटाने शेतकरी बेजार झाले असून, बाजार पेठ उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. याचेच उदाहरण म्हणून पातूर येथील लिंबू उत्पादक शेतकरी रमेश काळपांडे यांचे आर्थिक कंबरडे मोडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
  पातूर तालुका येथील शेतकरी रमेश काळपांडे यांचे उदर निर्वाहाचे साधन म्हणून साडेतीन एकर लिंबू ची लागवड त्यांनी पट्टेअमराई या भागात केली. गेल्या25 वर्षांपासून लिंबू शेती  करत आहेत. या शेतीमध्ये साधारण 7 ते 8 फूट उंचची व भरघोस लिंबाने भरलेली लिंबुची झाडे दिमाखाने ऊभी आहेत. यावर्षी चांगले सुपीक पीक असल्याने  काळपांडे आनंदी होते. परंतु वादळी पाऊस आणि सद्यस्थितीत असलेले लॉकडाऊन यामुळे या पिकाची हानी सुरू झाली. काळपांडे यांच्या शेतातील झाडांना मागील वर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणावर लिंबू  आले होते. परंतु सतत चालू असलेल्या वादळी पाऊस, वारा यामुळे या शेतामध्ये लिंबूचा सडा रोज हजारो च्या प्रमाणात पडतो. पण लॉकडाऊनमुळे बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे हा माल जागेवर नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे.  शासनाने या बाबीची दखल घेऊन नुकसान ग्रस्त शेतकरी यांच्या नुकसान शेतीचा सर्वे करून नुकसान भरपाई द्यावी अशीं मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. पातूर तालुक्यात दीड हजार एकर शेती वर लिंबूचे उत्पादन आहे सदर उत्पादन संकटात असल्याने वेळीच उपाय योजना शासनाने करावी अशी मागणीही करण्यात येत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *