कवठे येमाई,शिरूर : जागतिक महिलादिनी शिरूरला महिलांचे आरोग्य तपासणी शिबीर, मनस्विनी महिला उन्नती संस्था व पोलीस मित्र संघ महाराष्ट्र राज्य यांचा संयुक्त उपक्रम

583
           कवठे येमाई,शिरूर : जागतिक महिलादिनी मंगळवार दि. १२ रोजी  शिरूर येथील नगरपालिका मंगल कार्यालयात महिलांच्या आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त महिलांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मनस्विनी महिला उन्नती संस्थेच्या अध्यक्षा वैशाली गायकवाड यांनी सा.समाजशिलशी बोलताना दिली.
          मनस्विनी महिला उन्नती संस्था व पोलीस मित्र संघ महाराष्ट्र राज्य यांचा हा संयुक्त उपक्रम असून शिबिरात महिलांची आरोग्य तपासणी,स्तन व गर्भाशय तपासणी,रक्त तपासणी विविध आजारा बाबतच्या तपासण्या मोफत करण्यात येणार असल्याची माहिती ही गायकवाड यांनी दिली. हे आरोग्य शिबीर सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
– प्रा.सुभाष शेटे,(कार्यकारी संपादक,सा.समाजशील)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *