जांबूतच्या कोरोना योद्ध्यांना दिले ग्लास शिल्ड व मास्क – डॉ. संतोष पोटे यांचा विधायक उपक्रम 

669

जांबुत ता.शिरूर : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – मागील दोन महिन्यापासून कोरोनाचे आस्मानी संकट संपूर्ण जगावर घोंगावतेय. जगासह आपण सर्वच जण या संकटाचा विविध उपाय योजना राबवित सामना करीत आहोत. शिरूर तालुक्यातील जांबुत येथेही स्थानिक प्रशासन व तरुणमित्र गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून रात्रंदिवस विविध उपाय योजना व नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करीत आहेत.

जांबुत येथे कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्यांना सुरक्षा मिळावी या उद्देशाने जांबूत गावच्या प्रत्येक सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व विधायक कामात नेहमीच बहुमोल मार्गदर्शन आणि भरीव प्रकारची मदत करणारे, आपण ही आपल्या मातृभूमीसाठी या संकटसमयी काहीतरी मदत केली पाहिजे या हेतूने  वैद्यकिय क्षेत्रामध्ये रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानणारे,धार्मिक प्रवृती जपणारे डॉ. संतोष पोटे यांनी आज कोरोना प्रतिबंधात्मक काम करणा-या जांबूत ग्रामपंचायत प्रशासनातील ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे, पोलिस पाटील राहूल जगताप व प्रशासनातील कार्यरत कर्मचारी यांना सुरक्षा म्हणून ग्लास शिल्ड व मास्क स्वखर्चाने भेट देऊन ग्रामपंचायत प्रशासन व कर्मचारी यांना या कामी सुरक्षा मिळावी म्हणून हा उपक्रम राबविला आहे.    यावेळी डॉ.के.आर.फलके,माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव आण्णा जोरी, माजी मुख्याध्यापक भिकाजी शिंदे गुरुजी हे उपस्थित होते. डॉ. संतोष पोटे यांनी राबविलेल्या या विधायक उपक्रमाचे जांबुत ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *