कोरोना आपत्ती निवारण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस १,११,१११/- ची मदत – विश्वव्यापी मानवधर्म आश्रम,पाटेठाणचा उपक्रम 

596

        सणसवाडी ता.शिरूर : (प्रतिनिधी,ज्ञानेश्वर मिडगुले) – शिरुर-हवेलीचे आमदार अँड.अशोक पवार यांच्या हस्ते शिरुरचे प्रांत संतोष देशमुख यांच्याकडे नुकताच जातेगाव येथे विश्वव्यापी मानवधर्म आश्रम,पाटेठाणच्यावतीने कोरोना आपत्ती निवारण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस १,११,१११/-  मदतनिधीचा चेक देण्यात आला.
कोरोना सारख्या महामारीने संपूर्ण जगात हाहाकार निर्माण झाला असताना देशासह राज्यातही अनेक सामाजिक संस्था,व्यक्ती प्रधानमंत्री सहायता निधी,मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आर्थिक मदत करुन आप-आपल्या परीने सामाजिक जबाबदारी पार पाडत आहेत.
राज्यावर ओढावलेल्या कोरोनारुपी आपत्तीचे निवारण करण्यासाठी  विश्वव्यापी मानवधर्म आश्रम,पाटेठाणचे सदगुरु समर्थ श्री.सुमंतबापुजी हंबीर यांच्या मार्गदर्शनानुसार विश्वव्यापी मानवधर्म  आश्रमाच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १,११,१११/-रुपयांचा मदतीचा चेक शिरुर तालुक्यातील जातेगाव येथील व्यंकटेश कृपा साखर कारखानास्थळी शिरुर-हवेलीचे आमदार अँड.अशोकबापू पवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी,पुणे यांच्याकडे जमा करण्यासाठी शिरुरचे उपविभागीय अधिकारी संतोष देशमुख यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.
राज्यासह देशात आलेल्या विविध आपत्तींना रोखण्यासाठी आश्रमाच्यावतीने शक्य होईल तेवढी मदत वेळोवेळी करण्यात येत असते.याच अनुषंगाने राज्यातील  कोरोना प्रादुर्भाव निवारण्यासाठी आश्रमाच्या साधकवर्गाने सामाजिक कर्तव्य व बांधिकलीतून हा निधी जमा करुन सदगुरु समर्थ श्री.सुमंतबापु हंबीर यांच्याकडे सुपुर्द केला होता.
त्याचबरोबर कोरोना लॉकडाऊन काळात सदगुरुच्या मार्गदर्शनाखाली आश्रमाच्यावतीने सदगुरु समवेत हजारो शिष्य आप-आपल्या निवासस्थानी विश्वात्मक देवाकडे कोरोना आपत्तीचे निवारण होण्यासाठी ध्यानाद्वारे प्रार्थनाही करत आहेत. तर हा मदतनिधी चेक सुपुर्द करत असताना आश्रमाचे उपाध्यक्ष कैलासआण्णा हरगुडे,खजिनदार विठ्ठलआबा सातव,शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सदाशिव शेलार,विनायक थोरात सर उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *