मुरबाड तालुक्यातील शंभर गावांच निर्जंतुकीकरण सुरु – चेतन सिंह पवार यांचा उपक्रम 

680
         मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटी पर्यावरण विभागचे प्रदेश सरचिटणीस चेतनसिंह पवार यांनी कोरोना लढाईत १०० गावांचे सॅनिटायझरच्या फवारणीव्दारे निर्जंतुकीकरणा प्रारंभ केला असून कोरोना लढाईत त्यांची टीम नागरिकांच्या कोरोना पासून सुरक्षिततेसाठी धडपड करताना दिसत आहे.
          या  उपक्रमामुळे गावागावात  कोरोना पासून बचाव कसा करावा यांची जनजागृती करण्यात येत आहे . सध्यस्थिती ठाणे शहर, कल्याण-डोंबिवली क्षेत्र, बदलापुर आदी रेड झोन मधुन १० ते १२ हजार नागरिक आपआपल्या मुरबाड तालुक्यामधील मुळ गावात स्थलांतरित झाली आहेत. तालुक्यामधील प्रत्येक जिल्हापरिषद गटामधील निवडक गावामध्ये राहुल गांधी विचारमंच, मुरबाड तालुका पदाधिकारी, विभागप्रमुख तसेच शाखाअध्यक्ष यांच्या माध्यमातुन फवारणीचे काम करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
            पुढील काही दिवसात नियोजन करुन बाकी गावे पुर्ण करण्यात येतील तसेच रेड झोन मधुन स्थलांतरित झालेल्या नागरिकांनी स्वतःहून होम क्वारंटाईन करुन घ्यावे व आपल्यामुळे कोरोना पसरवण्यासाठी मदत होईल अशी कृती करु नये अशी कळकळीची विनंती यावेळी चेतनसिंह पवार यांनी केली आहे.
            तालुक्यातील  शिरगाव, मोहरई, मोहरईपाडा, घुट्याची वाडी, कुडवली, पिपंळगाव, पवाळे, वज्रेचीवाडी, वेलद्याचीवाडी, नानकसवाडी, उंबरवाडी, भालुक, मोरेपाडा, ठाकरेनगर, कोळठण, मानिवली (गो), शिंदीपाडा, खांडपे, माल्हेड, डेहणोली, आंबेळे बु, शिवळे, वडाचापाडा, कोडेंसाखरे, कोरावळे, मोहोप, नारायणगाव, उंबरपाडा, नेवाळपाडा, इंदिरावाडी, साखरे, भालकीचापाडा, आंबेळे खु, नांदगाव, माजगाव, कान्हार्ले, खेडले, बंगालपाडा, उमरोली, बळेगाव, कदमपाडा, नावडीचापाडा, लडकुपाटीलपाडा, तिवारपाडा, टोकावडे, खापरी, लाकुडपाडा, शाई, वेळुक, आळवे, खेड, जडई, आंबिवली, फांगलोशी, खुटल, पायरवाडी, न्याहाडीवाडी, आल्याचीवाडी, बांडशेत, मोधलवाडी, वालिवरे, मोरोशी, मोरोशीवाडी,फांगणे, करपटवाडी, झाडघर, कुडशेत, बनाचीवाडी, पारधवाडी, फांगुळगव्हाण, पेंढरी, वाघाची वाडी, सोनावळे, सोनगाव, उमरोली(शि), दुधनोली, खोपिवली, देहरी, तळेखल, देशमुखपाडा, कळभांड(मु), बांधिवली, घाघुर्ली, साकुर्ली, खानिवरे, जांभुर्डे, डोंगरन्हावे, गवाळी, मुळ्याचा पाडा, आंबेगाव, म्हसा, सासने, शिरवली, मानिवली, वेहरेचीवाडी, खोंड्याचीवाडी, टेंभरे खु, जानपाटलाचा पाडा, टेंभरे बु, रावगाव, भुवन, नढई, जामघर, वांजळे, किशोर, घोरले, असोळे, वाघिवली, असोसे या गावात चेतनसिंह पवार यांच्या माध्यमातून निर्जंतुक करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *