५४ वा बालगंधर्व रंगमंदिर महोत्सव २०२२; ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

216

पुणे (-प्रतिनिधी,सचिन दांगडे) :बालगंधर्व रंगमंदिराच्या ५४ व्या वर्धापन दिना निमित्त २५ ते २७ जून दरम्यान ‘बालगंधर्व रंगमंदिर महोत्सव 2022’चे आयोजन करण्यात आले आहे.  यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.यावेळी निर्माते संतोष चव्हाण,नृत्य दिग्दर्शक अर्जुन जाधव, उपाध्यक्ष योगेश जाधव ,विनोद धोकटे,खजिनदार अण्णा गुंजाळ, अरुण गायकवाड, सह खजिनदार कैलास माझिरे,सचिन अनिल गोंदकर, चित्रसेन भवार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

महोत्सवा बद्दल माहिती देताना मेघराज राजेभोसले म्हणाले, महोत्सवाचे उदघाटन २५ जून रोजी दुपारी १२:३० वा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या  खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी माजी आमदार उल्हास पवार, मा. आ चेतनदादा तुपे, कृष्ण कुमार गोयल,संजय चोरडिया(अध्यक्ष-सुर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन),विनय सातपुते(संचालक-वन ओटीटी प्लॅटफॉर्म) ,चेतन मणियार(संचालक-वन ओटीटी प्लॅटफॉर्म)आदी उपस्थितीत राहणार आहेत. याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. महोत्सवा दरम्यान, एकपात्री जादूचे प्रयोग,स्व. लतादीदी आणि स्व. बप्पी लहरी यांच्या गीतांची संगीतरजनी, संतवाणी , महिलांसाठी खास लावणी महोत्सव, रंगभूमी आणि रंगमंदिर या विषयावर परिसंवाद, फिटे अंधाराचे जाळे हा सुगम संगीताचा कार्यक्रम, अभिनेते माधव अभ्यंकर यांच्या हस्ते इयत्ता 10 आणि 12 उतीर्ण झालेल्या कलाकारांच्या पाल्यांचा सत्कार होणार आहे. तसेच महाराष्ट्राची लोकधारा, महाराष्ट्राची पारंपारिक लावणी,हास्य नगरी,बिग बॉस, यशस्वी मराठी चित्रपटांची यशोगाथा,महाराष्ट्रातील लोक गायकांचा तुफानी जल्लोष हा कार्यक्रम, नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या सादरीकरणादरम्यान त्या त्या कला विभागातील सर्व कलाकारांना’बालगंधर्व’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

दरम्यान, लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेता प्रसाद ओक, अभिनेता आदिनाथ कोठारे,अभिनेत्री अमृता खानविलकर, दिग्दर्शक  दिग्पाल  लांजेकर, अभिनेता अजय पुरकर, मंगेश देसाई यांच्या मुलाखती राजेश दामले घेणार आहेत, तर अभिनेते स्वप्नील जोशी, अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेत्री गार्गी फुले यांच्याशी सौमित्र पोटे संवाद साधणार आहेत. तसेच मराठी बिग बॉस च्या गमती जमती या कार्यक्रमात सुरेखा पुणेकर, तृप्ती देसाई, मीरा जगन्नाथ, डॉ. उत्कर्ष शिंदे, सुरेखा कुडची, अक्षय वाघमारे, गायत्री दातार आदी कलाकार सहभागी होणार आहेत असेही मेघराज राजेभोसले यांनी सांगितले.

यंदाच्या बालगंधर्व परिवार पुरस्कारांचे मानकरी – जीवन गौरव पुरस्कार –  ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर, संगीत नाटक अभिनय – राम साठे, नाटक विभाग अभनय – आशुतोष नेर्लेकर, अंजली जाखडे, लेखन विभाग (नाट्य) – योगेश सोमण, दिग्दर्शन विभाग (नाट्य)  – डॉ संजीवकुमार पाटील, एकपात्री कलाकार विभाग – स्वाती सुरंगळीकर, जादूगार विभाग – प्रसाद कुलकर्णी, संगीत रजनी विभाग – श्रीकांत खडके, प्रकाश गुप्ते, परविंदर सिंग -चौहान, अश्विनी कुरपे, चेतन खापरे, लावणी विभाग – सागर वुपारगुडे, बालाजी जाधव, विजय उल्पे, अप्सरा जळगावकर, सोनाली जळगावकर, स्वाती शिंदे, ज्येष्ठ लावणी तमाशा कलावंत – कामिनीबाई पुणेकर(दगडाबाई), मिनाबाई दादू गायकवाड, बबनराव रामचंद्र म्हस्के, लोकसंगीत / लोकगायक – अमर पुणेकर, बालनाट्य विभाग – आसावरी तारे, ध्वनी संयोजन – मेहबूबभाई पठाण, निरंजन सपकाळ, प्रकाश योजना – नीलेश गायकवाड, विजय चेंनुर, नैपथ्य विभाग – रामदास गोळेकर, बुकींग क्लार्क – अक्षय जगताप, उद्यान विभाग – सुहास खोजे, सुरक्षा विभाग – हेमंत बालगुडे, लोकधारा विभाग – हर्षद गनबोटे, रमेश गवळी, रशीद पुणेकर, संतोष अवचिते, स्नेहल माझिरे, संजय मगर, सतीश वायदंडे




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *