मुरबाड तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ

674

तालुक्यात बाहेरून येणारे ठरतायेत तापदायक  

मुरबाड,ठाणे (-प्रतिनिधी, जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्यात आतापर्यंत जेवढे कोरोना रुग्ण आढळले हे तालुक्याबाहेरून आलेल्या व्यक्ती असल्याने तालुक्यात बाहेरून येणारे तापदायक ठरत असल्याचे दिसत आहे. मुरबाड तालुक्यात सध्या कोरोना रुग्णाची संख्या 5 झाली असून यात एका 70 वर्षा च्या आजींचा समावेश आहे. तालुक्यातील कोंडेसाखरे व शिरगाव येथे रुग्ण आढळून आल्याने कोरोना मुक्तीकडे वाटचाल करणारा मुरबाड तालुका पुन्हा कोरोना ग्रस्त ठरला आहे. तालुक्यातील बाहेरून येणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने अधिक काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभाग करत आहे. तर गावात  बाहेरून येणाऱ्या नागरिकांची माहिती त्वरित आरोग्य विभागाला कळवावे कळवणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे आरोग्य अधिकारी मुरबाड श्रीधर बनसोडे यांनी सांगितले. कोरोना तालुक्यातुन हद्द पार करण्यासाठी सर्व नागरिकांनी नियमाच काटेकोर पालन करावे असे ही आवाहन करण्यात आले आहे




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *