मुरबाड,ठाणे : मुरबाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची कॉग्रेसची मागणी , तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्याना निवेदन .

522
              मुरबाड,ठाणे : राज्य शासनाने नुकतीच राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्याची यादी जाहीर केली, या यादीत मुरबाड तालुक्याचा समावेश करण्याची मागणी कॉग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हा सरचिटणीस इंजिनिअर चेतन सिंह पवार यांनी शेतकरी प्रतिनिधि प्रकाश पवार, कृष्णा केंबारी, नरेश मोरे, धनाजी बांगर व ईतर पदाधिकाऱ्या सह मुरबाड तहसिलदार सचिन चौधर यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांना निवेदन दिले आहे.
             तालुक्यातील भात पिकांची परिस्थिति पहाता भात शेतीतील हलवार पिंकाची परिस्थिति ठिक आहे मात्र निमगरवा व गरवा  प्रकारची भातशेती पावसाच्या कमी प्रमाणा मुळे करपली असुन त्यात पंलीज झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. गावागावात प्रत्यक्ष पहाणी केल्यास नुकसान झाल्याचे समोर येईल तर मुरबाड तालुका प्रशासनाने काढलेली नजरअंदाज आणेवारी मुळे  दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत मुरबाड तालुका समाविष्ठ न झाल्याने मुरबाड तालुक्याची आणेवारी 50 पैशाच्या आत घेवुन मुरबाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशीमागणी  कॉग्रेस कडुन होत आहे .
-प्रतिनिधी, जयदीप अढ़ाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *