मुरबाड,ठाणे : लहान मुलांच्या नाचनी सत्वात निघाल्या आळ्या,जिनवर कंपनीच्या स्ट्रॉबेरी फ्लेवर वर कारवाईची मागणी

1376
               मुरबाड,ठाणे : मुरबाड मधिल राजश्री मेडीकल स्टोअर मधुन खरेदी केलेल्या  जिनवर कंपनीच्या नाचणी सत्व या लहान मुलाच्या आहार औषधात आळ्या निघाल्याने या नाचणी सत्वाचा ग्राहक दत्तात्रय रघुनाथ गगे यानी कंपणीवर कारवाईची मागणी केली आहे.
         लहान मुलांना जिवनसत्वाची कमतरता पडु नये म्हणून डॉक्टरांकडुन नाचनी सत्वा सारखे आहार लिहुन देतात.  मात्र यात काय असते ते न पहाताच ते  मुलांना दिले जाते.  मात्र तक्रारदार गगे यांनी  जिनवर कंपनीचे सिलबंद नाचणी सत्व आपल्या मुलासाठी नेले असता यात आहार देताना पाहिले तर त्यांना त्यात आळ्या आढळुन आल्या. याबाबत राजश्री मेडीकल मधिल कर्मचाऱ्यानी आम्ही सिलबंद नाचणी सत्व दिले होते.  त्यात काय होते हे आम्ही हि सांगु शकत नाही.  मात्र आपली तक्रार योग्य असुन आम्ही कंपनी कडे तक्रार करुन न्याय मिळवुन देण्यास कटिबध्द आहोत. सदर खरेदी केलेले नाचणी सत्व पँकेट ऑगस्ट 2018 मध्ये बनवले असुन वर्ष भराची मुदत असताना ह्या पँकेट मध्ये आळ्या निघाल्याने या उत्पादन वर कारवाई करण्याची मागणी गगे यांनी केली आहे.
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड,ठाणे)  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *