खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर मधील कोरोना योद्धयांना आर्सेनिक अल्बम 30 औषधांचे वाटप 

516

शिरूर (समाजशील वृत्तसेवा) : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आज संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त व ऋषीराज अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली कोरोना योद्धा शिरूर नगरपालिकेतील सफाई कर्मचारी, पोलिस स्टेशन मधील स्टाफ तसेच रामलिंग रोड येथील सिंधुताई संकपाळ यांच्या अनाथ आश्रम येथे कोरोना आजारापासून वाचण्यासाठी आवश्यक असलेली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आर्सेनिक अल्बम 30 औषधांचे वाटप करण्यात आले. या गोळ्यांचे वाटप शिरूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या वतीने तर,  शिरूर शहर राष्ट्रवादी लीगल सेलचे अध्यक्ष अॅड रविंद्र खांडरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सागर नरवड़े, पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थि काँग्रेसचे सरचिटणीस राहिल शेख, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष हाफिज बागवान, शिरूर शहर राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष रंजन झांबरे, वरिष्ठ उपाध्यक्ष कलीम सय्यद, अक्षय सोनवणे, रुद्र राखुंडे, शैलेश साळवे, अक्षय सोनवणे, वैभव लांडे उपस्थित होते. या विशेष कार्यक्रमाला वेदांता हॉस्पिटलचे डॉ.आकाश सोमवंशी विशेष सहकार्य लाभले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *