शिक्रापूर,पुणे : राष्ट्रवादी युवकच्या पुणे जिल्हा सरचिटणीस पदी मयूर करंजे यांची निवड

440

               शिक्रापूर,पुणे : शिक्रापूर ता. शिरूर येथील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक मयूर खंडेराव करंजे यांची यापूर्वी त्यांनी शिरूर तालुका उपाध्यक्ष या पदाच्या माध्यमातून केलेल्या विविध कामांची दखल घेत त्यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल मा.आमदार अशोक पवार, मा. आमदार रमेश थोरात व पक्ष पदाधिकाऱयांनी कारंजे यांचे अभिनंदन केले आहे.

               शिक्रापूर ता. शिरूर येथील मयूर करंजे यांची यापूर्वी पक्षाशी असलेली एकनिष्ठा पाहून त्यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिरूर तालुका उपाध्यक्षपदावर निवड करण्यात आली होती. त्यांनतर देखील त्यांनी केलेल्या विविध कामांची दखल घेत त्यांची आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली असून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले यांनी नियुक्तीपत्र दिले असून खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, माजी आमदार अशोक पवार यांच्या हस्ते मयूर करंजे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिरूर तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, शिवाजी दरेकर, सचिन करंजे यांसह आदी उपस्थित होते. तर यावेळी बोलताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व अजितदादा पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवीत, सर्वसामान्य जनतेसाठी विविध कामे करून पक्ष संघटना बळकटी साठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे मयूर करंजे यांनी सा.समाजशीलशी बोलताना सांगितले.

– प्रतिनिधी,शेरखान शेख,(सा.समाजशील,शिक्रापूर)  




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *