मुरबाड,ठाणे : मुरबाड कल्याण राष्ट्रीय महामार्ग 61 वर काळ्या पिवळ्या खाजगी प्रवाशी गाडी व टँम्पोचा अपघात, चालक जागीच ठार तर 13 प्रवाशी जखमी

1446
                     मुरबाड,ठाणे : मुरबाड – कल्याण राष्ट्रीय महामार्ग 61 वर दाट धुक्यामुळे काळ्या -पिवळ्या खाजगी गाडीचा व एका टँम्पोचा मामणोली  गावाजवळ  भिषण आपघात  झाला. या अपघातात चालक जागीच ठार तर गाडीतील तेरा प्रवाशी जखमीझाले आहेत तर  टँम्पो हि पलटी  झाला.  सकाळीच हि घटना घडल्याने आज  काळ्या पिवळ्या गाड्यांची खाजगी प्रवाशी वाहतुक बंद ठेवण्यात आली.तर बेकरदार  वाहतुकीमुळे प्रवाश्याच्या सुरेक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
                      याबाबत सविस्तर वृत्त असे कि  मुरबाड हुन सकाळी प्रवासी भरुन कल्याण कडे जाणाऱी काळी पिवळी क्र एम एच 05 आर 2067 हि गाडी दाट धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने समोर कल्याण दिशेने  जाणाऱ्याच टँम्पो क्र एम एच 14 जीयु 3992 यावर धडकल्याने काळ्या पिवळ्या गाडीचा चालक हरिचंद्र नवले रहाणार वैशाखरे हा जागीच ठार झाला. तर काळ्यापिवळी गाडीतील 13 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील काहीची प्रकृती गंभिर असुन राहुल मोहपे रा. पऱ्हे  हा फोर्टीज हॉस्पीटल कल्याण येथे उपचार घेत आहे तर  सचिन जगन्नाथ श्रीखंडे  हा उल्हास नगर येथिल सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहे.  उर्वरित जखमी सोयी नुसार वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल असल्याने त्यांची नावे अजुनही समजले नसल्याचे सुत्रानी सांगितले. मुरबाड आगारातुन सकाळच्या सत्रात मुंबई ,कल्याण, डोंबिवली  ,ठाणे या भागात प्रवास करणारे  विद्यार्थी, कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात असुन  वेळेवर बसेस नसल्याने हे सर्व प्रवाशी बस ची वाट न पहाता खाजगी प्रवासाचा सहारा घेत कामाच्या ठिकाणी जातात व कधी कधी अशा घटनाना सामोरे जातात व जीव गमावतात. या मुळे बसचा प्रवास सुरक्षित असताना व बस साठी  प्रवासी   असताना हि मुरबाड आगारातुन बस उपलब्ध न होणे यातून खाजगी वाहतुकीला चालना मिळत असल्याचा आरोप आता प्रवाश्याकडुन होत आहे . सकाळी घडलेल्या अपघाताच्या  घटनेत  काही कॉलेजचे तरुण, महिला व कामगार प्रवाशी असल्याची माहीता जमलेल्या नागरिकानी दिली. तर या अपघाता नंतर तरी सकाळ च्या सत्रात मुरबाड  कल्याण बस  सुरु होतील का असा सवाल प्रवाशी वर्गातुन  होत आहे.
– प्रतिनिधी, जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *