रविवारी सुट्टीच्या दिवशी कवठे आरोग्य केंद्र कार्यतत्पर,नसबंदी शिबिराचे आयोजन 

458
         कवठे येमाई,शिरूर :  (सुभाष शेटे,सा.समाजशील) – शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्रात आज रविवार सुट्टीचा दिवस असताना ही बिन टाक्याची स्त्री नसबंदी शस्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश कट्टीमणी व त्यांचा कर्मचारी वर्ग यांनी आज प्रजासत्ताक दिनी सकाळी ध्वजवंदन करून या शिबीराची तयारी सुरु केल्याचे पाहावयास मिळाले.
         कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत मार्च २०२० अखेर पर्यंत १२४ नसबंदी शस्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट असून पैकी आज अखेर ८५ स्त्री व ३ पुरुष शस्रक्रिया करण्यात आल्याची माहिती डॉ. कट्टीमणी यांनी दिली.आज स्त्री ११ बिन टाक्याच्या नसबंदी शस्रक्रिया करण्यात येणार असून या सर्व रुग्नांची तपासणी डॉ.कट्टीमनी यांनी केली. तर शस्रक्रियेनंतर या सर्व रुग्नांना सायंकाळी घरी सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *