शिरूरच्या पूर्वभागात प्रजासत्ताक दिन उत्साहात,तांदळीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव 

409
           तांदळी,शिरूर : (सा.समाजशील) – शिरूरच्या पूर्व भागातील तांदळी,इनामगाव,मांडवगण फराटा,गणेगाव,सादलगाव,बाभुळसर परिसरात आज २६ जानेवारी अर्थात स्वतंत्र भारताचा ७१ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
    तांदळी येथे स्व. केशव पांडुरंग गदादे विद्यालय व जि.प.प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण झाल्यानंतर स्व. केशव पांडुरंग गदादे विद्यायात मुख्य कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी ग्रामस्थांबरोबर विद्यार्थी मनोगते झाली.  नुकत्याच नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत गोल्ड व सिल्व्हर मेडल मिळविलेल्या गावातील विद्यार्थ्यांचा गौरव शिरूर पंचायत समितीचे कार्यक्षम सदस्य राजेंद्र गदादे व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी गाव तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष गोरख काका खोरे हे होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *