माजी आमदार गोटीरामभाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गावागावांत वृक्षारोपण ; तर शिवळे महाविद्यालयात रक्तदान शिबिर

369
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्यातील ग्रामस्थांमध्ये आस्था असलेले राजकीय नेते माजी आमदार गोटीरामभाऊ पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने तालुक्यातील विविध भागांत वृक्षारोपण कार्यक्रमाबरोबरच छत्रीवाटप आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमांना गावागावांत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मुरबाड विधानसभा मतदारसंघातून गोटीरामभाऊ पवार यांनी तब्बल चार वेळा आमदार म्हणून प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांचा मुरबाड तालुक्यातील गावांगावांमध्ये थेट संपर्क आहे. त्यांचे समर्थक, सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि मित्र मंडळांकडून मुरबाड तालुक्यातील विविध भागांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. तर शिवळे येथील महाविद्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात १०० हून अधिक ग्रामस्थांनी रक्तदान केले. त्यानंतर गरजू ग्रामस्थांना छत्रीवाटप करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमांना राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, जनसेवा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष तानाजी देशमुख, ऍड. प्रमोद चौधरी, जिल्हा परिषदेच्या सदस्या प्राजक्ता भावार्थे, रेखा कंटे, किसन गिरा, शिवसेनेचे तालुकाप्रमुख कांतिलाल कंटे, ज्येष्ठ नेते रामभाऊ दळवी, पांडुरंग कोर, प्रकाश पवार, भगवान भगत चिमा शिद, मधुकर एगडे आदी उपस्थित होते.
मुरबाड तालुक्यातील मुलांच्या शिक्षणासाठी माजी आमदार गोटीरामभाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा शिक्षण संस्थेकडून विविध शाळा-महाविद्यालये सुरू आहेत. त्यातील शिवळे महाविद्यालयात त्यांच्या अभिष्टचिंतनासाठी कार्यक्रम घेण्यात आला. त्यात मुरबाड तालुक्यासह ठाणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या वेळी कोरोना निर्बंधाचे पालन करून कार्यक्रम घेण्यात आले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *