आलेगाव येथे कोव्हीड काळामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान ; म.रा.मराठी पत्रकार संघटनेचा उपक्रम

355
पातूर, अकोला (-प्रतिनिधी,श्रीधर लाड) : पातूर तालुक्यातील आलेगाव येथील पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील, डॉक्टर व सामाजिक कार्यकर्ते आदींनी कोव्हीड काळामध्ये जीवाची पर्वा न करता उल्लेखनीय कामगगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना पातूर तालुका उपाध्यक्ष श्रीधर लाड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्याच्या वतीने पातूर येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये कोरोना काळामध्ये जीवाची पर्वा न करता उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बंधू यांचा प्रशस्तीपत्र,सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. पातूर येथील कोव्हीड योद्धा सन्मान कार्यक्रमामध्ये आलेगाव येथील सन्माननीय कोरोनाकाळात कार्य करणारे उपस्थित राहू न शकल्याने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश सुरजुसे तसेच तालुका अध्यक्ष देवानंद गहिले यांच्या मार्गदर्शनाखाली आलेगाव पोलीस चौकिला कार्यरत असलेले पोलीस नाईक दादाराव आढाव, पोलीस पाटील देवनाथ धाईत, शिवसेना पातूर तालुका प्रसिद्धी प्रमुख सोमिनाथ बोबडे, सामाजिक कार्यकर्ते विजय बोचरे व डॉ श्रीकांत सेवणेकर, आदींना मराठी पत्रकार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष श्रीधर लाड यांच्या हस्ते दि ९ रोजी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी पत्रकार नय्यर खान, अब्दुल जफर, दिलीप गिर्हे, रक्षण देशमुख, चेतन भुजबळ उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *