विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला जीवदान – शेतकऱ्याचा मुलगा व वन विभागाची तत्परता – कवठे येमाईच्या पळसकर मळ्यातील घटना –  वर काढताच बछड्याने ठोकली धूम 

884

शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) –  शिरूरच्या  पश्चिमेकडे असणाऱ्या कवठे यमाई गावातीळ पोकळ दऱ्यातील पळसकर मळ्यातील राजेंद्र पळसकर यांच्या डोंगराच्या पायथ्याशी अत्यंत अडचणीचे ठिकाण असलेल्या शेतातील विहिरीत साधारण सहा महिन्याचा बिबट्याचा बछडा पडल्याची घटना घडली.  आज दुपारी साडेतीनच्या सुमारास पाणी भरावयास विहिरीवर गेलेल्या त्यांचा मुलगा धिरजला पाण्याने फुल भरलेल्या विहिरीत बिबट्या पडल्याचे लक्षात आले. त्याने तात्काळ ही गोष्ट त्याचे चुलते पत्रकार मारुती पळसकर यांना व वडिलांना सांगितली.  याबाबत वनविभागाला तात्काळ माहिती देण्यात आली.वन कर्मचारी हनुमंत कारकुड तात्काळ त्या विहिरीजवळ पोहोचले सोबत आणलेल्या रेस्क्यू स्टिकने त्या छोट्याशा बछड्याला अलगद वर काढले.  त्याचा जीव वाचवत तात्काळ मुक्त वातावरणात सोडून दिले हा परिसर डोंगर भागात असल्याने या भागात बिबट्यांचे वास्तव्य असू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीकडे जाताना दक्षता  व काळजी घेण्याचे आवाहन शिरूर वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *