मुरबाड नगरपंचायतचा आदेश बंदचा मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशा मुळे नागरिक संभ्रमात – नगरपंचायत च्या मनमानी विरोधात मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार  

549
               मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – कोव्हीड -19 काळात  जिल्हाअधिकारी, ठाणे यांच्या १/०७/२०२० च्या आदेशानुसार व तसेच त्यानंतरच्या लॉकडाउन मुदतवाढच्या आदेशानुसार ठाणे जिल्ह्यातील सर्व  नगरपंचायत/ नगरपरिषद व ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू व शेतीची सर्व कामे सुरळीत चालू ठेवण्याचे आदेश देऊनही  मुख्याअधिकारी मुरबाड नगर पंचायत, मुरबाड यांनी दि. १०/०७/२०२० रोजी प्रेस नोट काढून जीवनावश्यक वस्तू बंद करण्याचे आदेश काढले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे आधीच आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी हवाल दिल झालेला आहे. त्यातच मुरबाड नगरपंचायतच्या अशा आदेशमुळे मुरबाड तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. तसेच  जिल्हाधिकारी, ठाणे यांचे आदेश व  मुख्याअधिकारी, नगरपंचायत मुरबाड यांच्यात विसंगती व परस्पर विरोध आढळुन आल्याने जनते मध्ये संभ्रमअवस्था निर्माण झाली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे लाखो लिटर दूध गटारात फेकण्याची वेळ आली आहे. तरी आपणास विनंती आहे कि, आपण त्वरित सदर प्रेस नोट वर कारवाईचे व चौकशी आदेश देऊन शेतकऱ्यांना न्याय दयावा  अशी मागणी दूध उत्पादक संघटना मुरबाड तालुकाध्यक्ष रामभाऊ बांगर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे
             त्याच प्रमाणे मुरबाड नगरपंचायत हद्दीतील कपडा , फूट वेअर , सलून  इलेक्ट्रॉनिक ही दुकाने लॉक डाऊन काळापासून बंद आहेत. तर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन मुरबाडकरांनी केले.  मात्र व्यापारी वर्गाला वेळोवेळी संभ्रमित करणारे बंदचे आदेश यामुळे बाजारात गर्दी आढळून आली.  जीवनावश्यक वस्तूची दुकाने सुरु असताना व्यापारी वर्गाकडून ग्राहकाला सूचना न करता विक्री करण्यात आली.  तर संपूर्ण लॉकडाऊन काळात बंदच्या काळात चढ्या भावात व मागच्या दरवाजाने वस्तू विक्री केली जात होती.  असे असताना नगरपंचायत कुठलीही कारवाई करताना दिसली नाही मुरबाड मध्ये बाजारपेठ बंद करताना औद्योगिक क्षेत्र ही बंद करण्याची मागणी सामान्य नागरिक करत आहेत. मुरबाड नगरपंचायतचा आदेश कि  जिल्हाधिकारी ठाणे यांच्या आदेशाचे पालन करावा असा प्रश्न नागरिकांना पडला असून मुरबाड तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा तहसीलदार अमोल कदम या बाबतीत कुठल्याही प्रकारच्या सूचना देत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *