मुरबाड शहरातील बंद मधून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्याची शिवसेनेची मागणी

430

मुरबाड,ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड नगर पंचायतीने काढलेल्या बंदच्या आदेशा मधून जीवनावश्यक वस्तू व सेवा यांची दुकाने वगळण्याची मागणी मुरबाड शहर शिवसेना प्रमुख रामभाऊ दुधाळे यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांचे कडे केली आहे. मुरबाड शहरातील दूध, औषध दुकाने, बँक वगळता सर्व दुकाने 13 ते 20 जुलै पर्यंत बंद करण्याचे आदेश मुरबाड नगर पंचायतीने काढला आहे, त्यामुळे लोक असंतुष्ट आहेत. लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बंद करून उपाशीपोटी घरी बसविणे तसेच शेतकऱ्यांचा भाजीपाला सारख्या नाशवंत माल विक्रीसाठी परवानगी न देता त्यांचे आर्थिक नुकसान करणे हा लोकांवर अन्याय आहे. जीवनावश्यक वस्तू अंडी, किराणा, मटण, मासे लोकांना जगण्यासाठी गरजेचे आहे. त्या वस्तू खरेदी करताना बाजारात गर्दी होऊ नये तसेच सुरक्षित अंतर ठेवणे,  मास्क लावणे यावर नगरपंचायतीने नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहता नगर पंचायतीकडे पुरेसे मनुष्यबळ नाही, त्यासाठी कोरोना विरूद्ध लढण्यासाठी स्वयंसेवी संस्था राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांचे सहाय्य घेऊन बाजार पेठेतील गर्दीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. परंतु कोरोना साथ सुरू झाल्या पासून नगरपंचायतीने असे सहाय्य करण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष किंवा स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधला नाही. तरी सुध्दा बाजारातील गर्दीवर नियंत्रण ठेवणे साठी शिवसैनिक स्वयंसेवक म्हणून काम करत होते. तेव्हा आम्हाला सहकार्य दिले नाही व कर्मचाऱ्यांना सांगून शिवसैनिक बाजार पेठेतील गर्दी कमी करण्यासाठी करत असलेले काम थांबवावे नाहीतर कर्मचाऱ्यांना त्रास होईल असे सांगत गर्दी नियंत्रण करण्याच्या कामा पासून त्यांना परावृत्त करण्यात आले  असल्याचाही आरोप ठाणे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *