यवतमाळ येथे महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मारकच्या विटंबन प्रकरणी अप्पर तहसीलदारांना निवेदन

480

दोंडाईचा,धुळे (-प्रतिनिधी,समाधान ठाकरे) : यवतमाळ येथे आझाद मैदान येथील शिक्षणमहर्षी राष्ट्रपिता क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाची अज्ञात माथेफिरू कडून झालेल्या विटंबना व तोडफोडीचा महात्मा जोतिबा फुले युवा प्रतिष्ठान व माळी समाजाकडून त्या माथेफिरूचा निषेध व्यक्त करून अप्पर तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाची अज्ञात माथेफिरून कडून विटंबना व तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली होती. तमाम माळी समाज बाधंवाना ठेस पोहचली असून शाहू, फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानां मानणारा समाज आहे. म्हणून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. त्या माथेफिरूंना अटक करून कडक शासन करावे असे निवेदनात नमूद केले आहे.  युवाप्रतिष्ठान व माळी समाज दोंडाईचा यांच्या वतीने निषेध व्यक्त करुन अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांना निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी यावेळी युवा महात्मा जोतिबा फुले युवा प्रतिष्ठान शहराध्यक्ष मयूर महाजन, प्रविण महाजन, मनोज महाजन, अनिल जाधव, अनिल माळी, रविंद्र माळी, ईश्वर माळी, सागर महाजन, मुकेश महाजन, दिपेश माळी, चेतन माळी, धनराज महाजन, महेंद्र महाजन, परमेश्वर महाजन, कैलास महाजन, कृष्ण माळी, मनोज माळी, मालपुर येथील बापू वाघ, पांडुरंग सुर्यवंशी, रोहिदास माळी, भालचंद्र खलाणे, विश्वास माळी यासह आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या होत्या.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *