मुरबाड लेनाड मार्गे शहापूर बाईकस्वारांसाठी पर्यायी रस्ता सुरू, गेल्या दोन वर्षा पासून या मार्गावर होतेय प्रवाश्यांची फरफट  

457
        मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – मुरबाड लेनाड मार्गे शहापूर या मार्गावरील काळू नदीवरील पूल नादुरुस्त झाल्या पासून या मार्गावर प्रवाशांची फरफट सुरू आहे.  सध्या शहापूर मुरबाड खोपोली  या मार्गाचे काँक्रीट करणं सुरू असून याच मार्गावरील काळू नदीचा पूल नव्याने बांधण्या साठी पाडण्यात आल्याने मुरबाड व शहापूर या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना आर्थिक ,मानसिक व शारीरिक त्रासा सह वेळ ही वाया घालवावा लागत असताना या पुला शेजारून पर्यायी रस्ता बाईकस्वारांसाठी तयार करण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
        या बाबत शहापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार दौलत दरोडा यांनी शुक्रवारी ता 15 रोजी मुंबई येथे एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांची भेट घेऊन संत तुकाराम महाराज चौक,शहापूर ते सापगाव रस्त्याची तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करणेबाबत व शहापूर – लेनाडमार्गे – मुरबाड जाण्यासाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी. (काळू नदीवर नव्याने उभारण्यात येत असलेल्या पुलाशेजारील जुना पर्यायी रस्ता) या आशयाचे लेखी निवेदन दिले होते.
       त्यामुळे जागे झालेल्या प्रशासनाने मोटारसायकल साठी हा रस्ता खुला केल्याचे सांगितले. यामुळे
  शहापूर तालुक्यातील नडगाव,कळगाव, दहिवली,लेनाड,शेंदरून आदी भागातील तरुण मोठ्या संख्येने मुरबाड औद्योगिक वसाहती मध्ये कामाला आहेत. त्यांना गेले पाच महिने नोकरी धंद्यावर जाणे साठी अत्यंत त्रास होत होता. काहींना नाईलाजास्तव आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागले होते. तसेच शहापूर मुरबाड तालुक्यातील नातेवाईकांकडे येणे जाणे बंद झाले होते.  त्यांची निदान मोटरसायकलने का होईना जाण्याची सोय झाल्याने लोकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र किमान कार,जीप अशा प्रवाशी वाहनांसाठी पर्यायी रस्ता करणे गरजेचे आहे त्यामुळे लोकांचा वेळ व पैसा वाचेल अशा मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *