रोटरी क्लब ऑफ वाडाचे एस्.टी.कर्मचाऱ्यांसाठी मोफत डोळे तपासणी शिबिर संपन्न   

474
    वाडा,पालघर (प्रतिनिधी,संजय लांडगे) – वाडा तालुक्यातील रोटरी क्लब ऑफ वाडा तर्फे लोटस आय हॉस्पिटल, एस्सीलॉर व्हिजन फाउंडेशन, डेल्टा लेन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य परिवहन कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत डोळे तपासणी तसेच मोफत चष्मा वाटप शिबीर आयोजित केले होते. वाहक, चालक आणि इतर विभागातील अनेक कर्मचारी व त्यांच्या नातेवाईकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
     रोटरी क्लब ऑफ वाडाचे अध्यक्ष शशांक ठाकरे म्हणाले की, “चालक-वाहक रोज हजारो प्रवाशांची ने-आण करत असतात. अशा वेळी त्यांची दृष्टी चांगली असणे तथापि नियमित नेत्रतपासणी  होणे आवश्यक आहे. यासाठीच या शिबिराचे आयोजन केले.”सदर शिबिर संपन्न करण्यासाठी उपक्रम प्रमुख प्रफुल्ल बोकंद, समीर गव्हाळे, मिलिंद बागुल, राकेश ठाकरे, डॉ. पराग ठाकरे व इतर सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. तर आगार व्यवस्थापक एम्. आर्.  धांगडा, वाहतूक नियंत्रक महेंद्र पष्टे, शाम ठाकरे आणि सर्व कर्मचाऱ्यांनी शिबिर आयोजकांचे आभार मानले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *