कवठे येमाई,पुणे : शिरूर तालुका मुख्याध्यापक शिक्षक संघ व पंचायत समिती शिरूर यांच्या संयुक्त विदय मानाने दिला जाणारा तालुका स्तरीय गुणवंत नाईक पुरस्कार म्हसे बुद्रुक येथील रावसाहेब मुसळे यांना प्रदान

1025
      कवठे येमाई,पुणे : शिरूर तालुका मुख्याध्यापकशिक्षक संघ व पंचायत समिती शिरूर यांच्या संयुक्त विदय मानाने दिला जाणारा तालुका स्तरीय गुणवंत नाईक पुरस्कार म्हसे बुद्रुक येथील रावसाहेब मुसळे यांना आज दि. २३ ला राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ विभागाचे सचिव डॉ.अशोक भोसले,घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे या मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

      शिरूरच्या विद्याधाम प्रशालेत झालेल्या या कार्यक्रमास शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यव उपस्थित होते.

           म्हसे बुद्रुक ता.शिरूर येथील बापूसाहेब गावडे माध्यमिक विद्यालयात गेल्या २० वर्षांपासून नाईक पदी अतिशय प्रामाणिकपणे व जबाबदारीने काम करीत आहेत.विद्यालयातील एका अत्यंत विश्वासू कर्मचारी म्हणून ते सर्वपरिचित आहेत. त्यांच्या या उत्कृष्ठ कार्याची दखल घेत शिरूर तालुका मुख्याध्यापक शिक्षक संघ व पंचायत समिती शिरूर यांच्या वतीने दिला जाणारा गुणवंत नाईक पुरस्कार आज त्यांना प्रदान करण्यात आला. तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे,पुणे जि.प. सदस्या सुनीता गावडे,पंचायत समिती सदस्या अरुणा घोडे, टाकळी हाजीचे आदर्श सरपंच दामुशेठ घोडे, म्हसे बुद्रुक येथील स्व.सोनभाऊ गावडे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सोनभाऊ मुसळे व ग्रामस्थांनी रावसाहेब यांचे अभिनंदन केले आहे.
– प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक,(सा.समाजशील)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *