दोंडाईचा,धुळे : अशी कार्यशाळा भविष्यात दोंडाईचा शहरातील सर्व शाळामध्ये घेण्याचे प्रयत्न करणार – रोटरी सनराईज अध्यक्ष -डॉ. प्रफुल दुगड

438
           दोंडाईचा,धुळे : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील रोटरी कल्ब ऑफ दोंडाईचा सनराईजन आयोजित व भारतीय जैन संघटना यांच्या सौजन्याने इ. ८ वी ते कॉलेज पर्यंतच्या मुलींसाठी “स्मार्ट गर्ल” युवती सक्षमीकरण हे २ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत दोंडाईचा शहरातुन ६३ मुलींनी सहभाग नोंदवला होता. या प्रशिक्षण शिबीरासाठी तज्ञ म्हणून ओळख असणा-या जैन संघटनेच्या उज्जेन येथील श्रीमती राजश्री चौधरी उपस्थित होत्या. या दोन दिवसीय कार्यशाळेत मुलींच्या सक्षमीकरण्यासाठी आणि अभिष्यात सामाजिक आव्हांनाना तोंड देण्यासाठी तयार करण्यासाठी अनेक खेळ व कुर्तीयुक्त लहान-लहान सत्रांचे आयोजन, ऑडियो व्हिजुयल च्या माध्यामांचा वापर आत्मजाणीव, आत्मसन्मान, तसेच स्वताचे संरक्षण नाते संबंध निवड आणि मासिक पाळी, मित्र आणि मोह गप्पा, गटचर्चा असे विविध विषयांवर मुलींसोबत चर्चा प्रात्यक्षिकातुन मार्गदर्शन करण्यात आले.
ह्या कार्यशाळेचे औपचारिक उदघाटन डॉ. विजय नामजोशी सर यांनी केले. तसेच कार्यशाळेच्या समारोपाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिल सोहनी, BJS दोंडाईचा चे अध्यक्ष जितेंद्र विनायवधा, BJS धुळे जिल्हा ग्रामीण सचिव रविंद्र टाटीया, श्रिकांत इंदाणी, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आशीष  अग्रवाल यांनी केले. या कार्यक्रमासाठी हस्ती पब्लिस स्कुलचे शालेय शिक्षण समीती व चेअरम कैलास जैन यांनी विशेष सहकार्य केले.
           कार्यक्रमाचे यसस्वितेसाठी रोटरी सनराईज चे अध्यक्ष डॉ. प्रफुल दुगड, प्रोजेक्ट चेअरमन हरिष झाबक, सचिव आशीष आग्रवाल नीलकंठ पाटील, नरेंद्र बाविस्कर, अमित चित्ते, सुरेंद्र गिरासे, जयराम पाटील, संजय धनगर, रविंद्र टाटीया, आदींनी प्ररिश्रम घेतले.
– प्रतिनिधी,समाधान ठाकरे,(सा.समाजशील,दोंडाईचा



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *